घरट्रेंडिंगCoronaVirus: सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्यासाठी झाडावर बांधलं घर!

CoronaVirus: सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्यासाठी झाडावर बांधलं घर!

Subscribe

ट्रीहाऊसची कल्पना एका युपीतील व्यक्तीला सुचली आहे. त्याने आपल्या मुलाच्या मदतीने हे ट्रीहाऊस बांधलं आहे.

देशात कोरोना विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे घरी राहा, सुरक्षित राहा, सोशल डिस्टसिंगचे पालन, असं सातत्याने सांगितलं जात आहे. काही जण या गोष्टीचे पालन करत आहेत तर काही जण या सूचनेचं पालन करताना दिसत नाही आहे. मात्र सोशल डिस्टन्सिंगगचा नियम एका गडाने खूपच गांभीर्यानं घेतल्याचं समोर आलं आहे. त्याने चक्क सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्यासाठी झाडावर घर बांधलं आहे. हा गडी उत्तर प्रदेशमधील असोधा गावातला रहिवासी आहे. मुकुल त्यागी असं याचं नाव आहे. त्याने या झाडावरच्या घराला ट्रीहाऊस असं म्हटलं आहे. त्याने वाळलेली लाकडं एकत्र करू हे घरी बांधलं आहे.

त्यागी म्हणाला की, देशात जेव्हापासून कोरोना विषाणू पसरला तेव्हापासून फक्त सोशल डिस्टन्सिंगकायम ठेवण्याचे ठरविले. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगची बाब लक्षात घेऊन आम्ही एकटे राहण्याचा निर्णय घेतला. माझ्या मुलाच्या मदतीने आम्ही झाडे तोडली आणि पाट्या एकत्र जोडल्या.

- Advertisement -

मुकुलचा मुलाने एएनआयला सांगितलं की, माझ्या वडिलांना ट्रीहाऊन तयार करण्याची कल्पना सुचली. खाली बसण्याकरिता फळी तयार करण्यासाठी आम्ही वाळलेल्या झाडांचा वापर केला. मग आम्ही एकत्र फळ्या बांधल्या. ट्रीहाऊन बांधण्याचा हा एक चांगला अनुभव आहे.

- Advertisement -

तो पुढे म्हणाला की, झाडावर राहणं आपल्याला निसर्गाशी जवळीक वाटते आणि वातावरण देखील इथले स्वच्छ आहे. मी झाडावर राहण्याचा आनंद घेत आहे. त्याला खाण्याच्या संदर्भात विचारलं असताना तो म्हणाला की, आम्हाला जेवण घरातून येत.

इंडिया कोविड-१९ ट्रॅकरच्या आकडेवारी नुसार, आतापर्यंत उत्तर प्रदेशमध्ये ४१० कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी चार जणांचा बळी गेला आहे. तसंच ३१ जण रिकव्हर झाले आहेत.


हेही वाचा – CoronaVirus: देशात कोरोना पसरवण्याचं षडयंत्र; ४० ते ५० कोरोना संशयित नेपाळमार्गे भारतात!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -