घरट्रेंडिंगCoronaVirus: नवजात बालकाचे नाव ठेवले सॅनिटायझर!

CoronaVirus: नवजात बालकाचे नाव ठेवले सॅनिटायझर!

Subscribe

जगभरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र या भीतीच्या वातावरणात देखील काही हैराण करणाऱ्या गोष्टी समोर येत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक मंडळी आपल्या नवजात बालकांची नावे कोरोना, कोविड आणि लॉकडाऊन अशाप्रकारे ठेवत आहेत. आता उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील एका नवजात बालकाचे नाव सॅनिटायझर ठेवले आहे. सहारनपूर जिल्ह्यातील खासगी रुग्णालयात रविवारी या बाळाचा जन्म झाला.

या नवजात बालकाचे वडील ओमवीरने एका वृत्तवाहिनी बोलताना सांगितलं की, सर्व देशभर पसरलेल्या कोविड-१९ पासून बचाव करण्याकरिता स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी हाताला सॅनिटायझर वापरणे फार महत्त्वाचे आहे. सरकार या संकटाच्या काळात पुरेस सॅनिटायझरचा पुरवठा करत आहे. जेणेकरून लोक त्याचा वापर करून सुरक्षित राहू शकतील. देशभरात गरजूंना मोफत सॅनिटाझरस देखील दिले जात आहेत.

- Advertisement -

तो पुढे म्हणाला, कोरोना व्हायरसला लढा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या उपययोजनामुळे मी आणि माझी पत्नी प्रभावित झालो आहोत. सध्या प्रत्येकजण सॅनिटायझरचा वापर करत आहेत. त्यामुळे आम्ही आमच्या बाळाचे नाव सॅनिटायझर ठेवले आहे.

आतापर्यंत उत्तर प्रदेशमध्ये ४८३ कोरोनाचे रुग्ण आढळले आहे. त्यापैकी ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच ४५ जण हे रिकव्हर झाले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – CoronaVirus: लवकरच तुमचा स्मार्टफोन होणार कोरोना ट्रॅकर!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -