घरदेश-विदेशUP: आग्रा 'होम स्टे हॉटेल'मधील सामूहिक बलात्कार प्रकरणाचा व्हिडीओ समोर; ती विनवणी...

UP: आग्रा ‘होम स्टे हॉटेल’मधील सामूहिक बलात्कार प्रकरणाचा व्हिडीओ समोर; ती विनवणी करत राहिली, पण…

Subscribe

उत्तर प्रदेशातील आग्रा येथील 'होम स्टे' या हॉटेलमध्ये महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. गँगरेप पीडितेचा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

लखनौ: उत्तर प्रदेशातील आग्रा येथील ‘होम स्टे’ या हॉटेलमध्ये महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. गँगरेप पीडितेचा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती लोकांकडे वाचवण्याची विनवणी करत आहे, तीने खूप गयावया केली परंतु, कोणीही तिच्या मदतीला धावून आलं नाही. सध्या पीडितेवर वैद्यकीय उपचार सुरू असून, सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. (UP Video surfaced in Agra Home Stay Hotel gang rape case She kept pleading but…)

पीडित महिलेवर ‘होम स्टे’ या हॉटेलमध्ये पाच तरुणांनी बलात्कार केला. तिने विरोध केल्यावर त्या महिलेला ओढून तिला मारहाणही केली गेली. महिलेचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे लोक जमा झाले आणि त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. तिला जबरदस्तीने खोलीत नेऊन अमानुष मारहाण केल्याचे पीडितेने पोलिसांना सांगितले.

- Advertisement -

नेमकं काय घडलं?

रिपोर्टनुसार, हॉटेल होम स्टेमध्ये पाच तरुणांनी मुलीला जबरदस्तीने दारू पाजली आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. पीडितेचे वय सुमारे 25 वर्षे आहे. यापूर्वी तिचा आक्षेपार्ह व्हिडिओ बनवण्यात आला होता आणि त्याबद्दल तिला ब्लॅकमेल करण्यात आल्याचे तिने सांगितले. आरोपींनी तिच्या डोक्यात काचेची बाटलीही फोडली. ताजगंज पोलीस स्टेशन हद्दीतील ताजनगरी फेज 2 मध्ये हॉटेल होम स्टे आहे.

पीडित महिला गेल्या दीड वर्षांपासून होम स्टेमध्ये काम करत होती. पीडितेचा मित्र जितेंद्र त्याच्या चार मित्रांसह हॉटेलमध्ये पोहोचला आणि तिला जबरदस्तीने दारू पाजण्याचा प्रयत्न केला. या घटनेशी संबंधित व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

- Advertisement -

महिला विनवणी करत राहिली पण कोणी ऐकले नाही

एका व्हिडीओमध्ये पीडित महिला खोलीच्या बाहेर जमिनीवर पडलेल्या अवस्थेत दिसली आहे, शेजारी एक तरुण उभा आहे आणि ती त्याला सांगत आहे की तिला लहान मुली आहेत. पीडिता अत्याचार केल्याचा आरोप करत वारंवार मदत करा, मदत करा असं ओरडताना दिसत आहे.

काही तरुण तिला पकडून बाहेर नेण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसऱ्या व्हिडिओमध्ये एक तरुण पीडित महिलेला जबरदस्तीने पकडून ठेवत आहे. पीडित तरुणी हात जोडून जीव वाचवण्यासाठी सतत भीक मागत आहे पण त्या नराधमांनी काहीही ऐकलं नाही, त्यांनी तिला ओढून एका रुममध्ये नेलं.

सर्व आरोपींना अटक

या घटनेबाबत एसीपी सदर अर्चना सिंह यांनी सांगितले की, ताजगंज पोलिसांना बसई चौकी परिसरातील होम स्टेमध्ये बलात्कार आणि मारहाणीची घटना घडल्याची माहिती मिळाली होती. पीडितेच्या तक्रारीच्या आधारे घटनेची दखल घेत बलात्कार, प्राणघातक हल्ला आणि इतर संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेतील चार पुरुष आणि एका महिलेसह पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

(हेही वाचा: Delhi Pollution : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशालाच दिल्लीकरांनी लावला फटाका! )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -