घरदेश-विदेशराफेल डील विरोधात सोनिया गांधी रस्त्यावर

राफेल डील विरोधात सोनिया गांधी रस्त्यावर

Subscribe

राफेल करारावरून संसदेमध्ये सुरू असलेली लढाई आता रस्त्यावर पाहायला मिळत आहे. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने रस्त्यावर उतरत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले.

राफेल डीलवरून संसदेमध्ये सुरू असलेली लढाई आता रस्त्यावर देखील पाहायला मिळत आहे. काँग्रेसच्या नेत्या आणि माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी रस्त्यावर उतरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. यावेळी काँग्रेसचे खासदार देखील आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. संसदेच्या परवानगीशिवाय राफेल करार झाल्याचा आरोप करत काँग्रेसने सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरत पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी राफेल कराराची चौकशी करण्याची मागणी देखील काँग्रेसने केली आहे. आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. संसदेमध्ये सत्ताधारी भाजपची कोंडी करत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्ला केला होता. त्यावरून संसदेमध्ये जोरदार रणकंदन देखील पाहायला मिळाले. त्यामुळे पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या काही दिवसांमध्ये सभागृहांमध्ये दिसणारी ही लढाई आता रस्त्यावर पाहायला मिळत आहे.

वाचा – बहुचर्चित राफेल विमान खरेदीचा करार का महत्त्वाचा?

राहुल गांधी यांचा देखील हल्लबोल

राहुल गांधी यांनी देखील संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये भाजपवर हल्लाबोल केला होता. यावेळी राफेल करारामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केल्याने संसदेमध्ये मोठा गदारोळ झाला होता. भाजपने देखील काँग्रेसला प्रत्युत्तर देत राफेल करार आणि त्यातील तरतुदी या काँग्रेसच्या काळात झाल्याचे म्हटले होते. यावेळी राहुल गांधी यांनी राफेल कराराची किंमत उघड करण्याची मागणी केली होती. शिवाय कालच ( गुरूवारी ) अरूण शौरी यांनी देखील राफेल करार हा बोफर्स करारपेक्षा मोठा असल्याचा आरोप केला. त्यामुळे या सर्वांना आता भाजप कशा प्रकारे उत्तर देते हे पाहावे लागेल.

वाचा – ‘बोफर्सपेक्षा राफेल घोटाळा मोठा’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -