घरताज्या घडामोडीभर कार्यक्रमात साध्वी प्रज्ञासिंह चक्कर येऊन पडल्या, कार्यक्रमात गोंधळ!

भर कार्यक्रमात साध्वी प्रज्ञासिंह चक्कर येऊन पडल्या, कार्यक्रमात गोंधळ!

Subscribe

श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रम सुरू असताना भारतीय जनता पक्षाच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना अचानक चक्कर आली आणि त्या खाली कोसळल्या. त्यानंतर त्यांना घरी नेण्यात आले. आजारी असल्याने त्या गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, अशी सूत्रांची माहिती आहे. सध्या कुणाशी बातचीत करू नका, विश्रांती घ्या, असा सल्ला डॉक्टरांनी त्यांना दिला होता.

गेले काही दिवस होत्या आजारी

३० मे या दिवशी खासदार प्रज्ञासिंह ठाकूर या हरवल्या आहेत अशा आशयाचे फलक भोपाळमध्ये लावण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त समोर आले. आपली तब्येत ठीक नसल्याचे त्यांनी एका व्हिडिओत म्हटले होते. त्यांना एका डोळ्याने व्यवस्थित दिसत नसल्याची त्यांची तक्रार होती. दुसऱ्या डोळ्यांनीही त्यांना स्पष्ट दिसत नसल्याची त्यांची तक्रार होती. त्यांच्या मेंदूपासून ते डोळ्याच्या पडद्यापर्यंतच्या भागाला सूज आल्याचेही म्हटले जात आहे.

- Advertisement -

काँग्रेसवर केला आरोप

काँग्रेसचे नेते आपल्याबाबत चुकीच्या गोष्टी पसरवत असल्याचे साध्वी प्रज्ञासिंह यांनी म्हटले होते. मी आज ज्या समस्यांनी ग्रस्त आहे या सर्व समस्या काँग्रेसच्या सरकारांनी दिलेल्या आहेत, असे आरोप प्रज्ञासिंह यांनी काँग्रेसवर केले होते. दरम्यान डॉक्टरांनी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना आरामाचा सल्ला दिला होता.


हे ही वाचा – कोरोनाचे ‘हे’ औषध पतंजली उद्या करणार लाँच

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -