Google Chrome तात्काळ अपडेट करा नाहीतर…, यूजर्सना केंद्र सरकारचा इशारा

तुम्हीसुद्धा ब्राउजर आणि इंटरनेटशी संबंधित कामासाठी गुगल क्रोमचा वापर करत आहात का? तर,ही बातमी तुमच्यासाठी आहे. केंद्र सरकारने गुगल क्रोमशी संबंधित इशारा युजर्सना दिला आहे. या इशाऱ्याकडे तुम्हीसुद्धा लक्ष देणे गरजेचे आहे. जेणेकरुन, हॅकर्सच्या जाळ्यातून तुमचा बचाव करु शकता.

Update Google Chrome now or else ..., Central Government warns users
Google Chrome तात्काळ अपडेट करा नाहीतर..., यूजर्सना केंद्र सरकारचा इशारा

प्रत्येकजण आपल्या संपूर्ण दिवसांत गुगल क्रोमचा वापर करत असतो. जर तुम्हीसुद्धा ब्राउजर आणि इंटरनेटशी संबंधित कामासाठी गुगल क्रोमचा वापर करत आहात का? तर,ही बातमी तुमच्यासाठी आहे. केंद्र सरकारने गुगल क्रोमशी संबंधित इशारा युजर्सना दिला आहे. या इशाऱ्याकडे तुम्हीसुद्धा लक्ष देणे गरजेचे आहे. जेणेकरुन, हॅकर्सच्या जाळ्यातून तुमचा बचाव करु शकता. याशिवाय तुमचा पर्सनल डाटा आणि बॅंक अकाउंट सुरक्षित राहू शकते. इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) ने 97.0.4692.71 पेक्षा जुने Chrome वर्जन वापरकर्त्यांसाठी हा सावधानतेचा इशारा दिला आहे. ज्याच्या वापरामुळे यूजर्स हॅकर्सच्या सापळ्यात अडकण्याची दाट शक्यता आहे. गुगल क्रोम ब्राउझरच्या 97.0.4692.71 पेक्षा जुन्या व्हर्जनमध्ये अनेक त्रुटी आढळल्या आहेत.

गुगल क्रोमने वापरणाऱ्या वापरकर्त्यांसाठी सरकारने एक अॅडव्हायजरी जाहीर केली आहे. ज्यामध्ये नमूद केले आहे की, V8 मधील टाइप गोंधळामुळे Google Chrome मध्ये अनेक कमतरता पाहायला मिळतात. यामध्ये वेब अॅप, यूजर इंटरफेस, स्क्रीन कॅप्चर, फाइल API, ऑटो-फिल आणि डेव्हलपर्स टूल्स यासारख्या अनेक कमतरता आहेत. या सर्व गोष्टींमुळे तुमचे डिव्हाइस हॅक होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तुमचा संपूर्ण डेटा आणि बँकेशी संबंधित माहिती हॅकर्स सहजपणे हॅक करु शकतात. हा धोका लक्षात घेऊन जुने व्हर्जन अपडेट करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

कसे कराल Google Chrome अपडेट

  • प्रथम ब्राऊझर ओपन करा.
  • त्यानंतर उजव्या बाजूवरील तीन बिंदूवर क्लिक करा.
  • नंतर सेटिंगमध्ये जाऊन About Chrome वर क्लिक करा.
  • यानंतर तुमचा ब्राउझर अपडेट होईल.

 


हेही वाचा – साऊथ सुपरस्टार Mahesh Babuचा मोठा भाऊ निर्माते Ramesh Babuयांचे निधन