घरताज्या घडामोडीUPPSC Exam 2021: एकुण १४ परीक्षांसाठी जारी केल्या नव्या गाईडलाईन्स, 'या' दिवशी...

UPPSC Exam 2021: एकुण १४ परीक्षांसाठी जारी केल्या नव्या गाईडलाईन्स, ‘या’ दिवशी होणार PCS पूर्व परीक्षा

Subscribe

९ महिन्यात १४ परीक्षा घेण्यात येणार आहेत. याची सुरुवात २५ जुलैपासून होणार आहे.

उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाने (UPPSC) एकूण १४ परीक्षांच्या नवीन सुधारित तारखा जाहीर केल्या आहेत. UPPSCने भरती परीक्षांचे सुधारित वेळापत्रक आपल्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार UPPSCच्या १४ परीक्षा जुलै २०२१ पासून एप्रिल २०२२ पर्यंत घेण्यात येणार आहे. UPPSC ची PSC पूर्व परीक्षा २०२१मध्ये कोरोना महामारीमुळे पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे आता ही परीक्षा २४ ऑक्टोबर २०२१ रोजी घेण्यात येणार आहे. PSC पूर्व परीक्षा याआधी १३ जून रोजी होणार होती. UPPSCने जाहीर केलेल्या नवीन वेळापत्रकानुसार, ९ महिन्यात १४ परीक्षा घेण्यात येणार आहेत. याची सुरुवात २५ जुलैपासून होणार आहे. (UPPSC Exam 2021: New guidelines issued for total 14 exams, PCS pre-exam to be held on this date)

२५ जुलै ते १० एप्रिल २०२२ पर्यत होणाऱ्या परीक्षांसाठी PSC ५३८ पदांच्या भरतीसाठी ६ लाख ९१ हजार १७३ उमेदवारांनी अर्ज केला आहे. नवीन वेळापत्रकानुसार स्टाफ नर्स पुरुष आणि स्रियांसाठीच्या परीक्षांचाही समावेश करण्यात आला आहे.PPSC PCS त्याचप्रमाणे सहाय्यक नवसंरक्षक (SCF) किंवा रेंज फॉरेस्ट ऑफिसर (RFO)ची पूर्व परीक्षा २०२१ पुढील सूचना येईपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शासकीय आंतर महाविद्यालयांमध्ये व्याख्याते २०२० ची पूर्व प्राथमिक परिक्षाही आयोगाने पुढे ढकलली आहे.

- Advertisement -

देशात कोरोना महामारीने देशभरातील बऱ्याच परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर पुन्हा एकदा परीक्षांचे वेळापत्रक देण्यात आले आहे. ज्या उमेदवरांनी UPPSC २०२१ परीक्षेसाठी अर्ज केला होता त्यांना uppsc.up.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन परीक्षेचे सुधारीत नवीन वेळापत्रक पाहता येणार आहे.


हेही वाचा – Corona Vaccine: अमेरिकेत Bharat Biotechच्या लसीला आपात्कालीन वापरासाठी परवानगी नाकारली

- Advertisement -

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -