घरदेश-विदेशUPSC 2021 Final Result : यंदाच्या युपीएससी परीक्षेत मुलींची बाजी; श्रुती शर्मा...

UPSC 2021 Final Result : यंदाच्या युपीएससी परीक्षेत मुलींची बाजी; श्रुती शर्मा देशात पहिली

Subscribe

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या 2021 (UPSC 2021) चा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. यंदाच्या युपीएससी परीक्षेत श्रुती शर्मा हिने पहिला क्रमांक पटकावला आहे. यंदा युपीएससी 2021 परीक्षेता पहिल्या चार स्थानांवर मुलींनीच बाजी मारली आहे. यात महाराष्ट्रातील 40 हून अधिक जणांना यश आले आहे. परीक्षेला बसलेले उमेदवार आयोगाच्या upsc.gov.in या वेबसाइटला भेट देऊन आपला निकाल पाहू शकतात. दरम्यान यंदा श्रुती शर्मासह अंकिता अग्रवाल, गामिनी सिंगला, ऐश्वर्या शर्मा टॉपर्स ठरल्या आहेत. (shruti sharma top in upsc 2021)

युपीएससी परीक्षेत प्रथम क्रमांक पटकवणारी श्रुती शर्मा जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या (Jamia Girl Shruti Sharma Top In Upsc) आरसीएची विद्यार्थिनी आहे. श्रुतीपाठोपाठ अंकिता अग्रवाल हिने दुसरा क्रमांक पटकावला आहे. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर गामिनी सिंगला, चौथ्या क्रमांकावर ऐश्वर्या वर्मा आणि पाचव्या क्रमांकावर उत्कर्ष द्विवेदीने स्थान पटकावले आहे. (Upsc Topper 2021)

- Advertisement -

दरम्यान यक्ष चौधरीला सहाव्या क्रमांकावर यश मिळाले आहे, तर आठव्या रँकवर इशिता राठी, नवव्या रँकवर प्रीतम कुमार आणि दहावा रँकवर हरकिरत सिंग रंधावालाला यश मिळाले आहे.

- Advertisement -
UPSC CSE 2021 results
UPSC CSE 2021 results

UPSC CIVIL SERVICES FINAL RESULT 2021 असा पाहा.

१) सर्वप्रथम UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जा.

२) आता तुम्हाला होमपेजवर UPSC CIVIL SERVICES FINAL RESULT 2021 या फायनल रिझल्ट लिंक दिसेल.

३) येथे तुम्हाला निवडलेल्या उमेदवारांच्या नावांसह एक PDF फाइल दिसेल.

४) आता तुम्ही तुमचा निकाल तपासू शकता आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट आउट ठेवू शकता.

UPSC द्वारे नियुक्तीसाठी एकूण 685 उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. यामध्ये 244 सामान्य, 73 EWS, 203 OBC, 105 SC आणि 60 ST प्रवर्गातील उमेदवारांचा समावेश आहे. UPSC द्वारे नागरी सेवा परीक्षा दरवर्षी घेतल्या जातात. पूर्व, मुख्य आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांनंतर निकाल जाहीर केला जातो. जे निकालात यशस्वी होतात ते IAS, IFS या अधिकारी पदासाठी पात्र होतात.


मोठी बातमी! रेल्वे प्रशासनाकडून 372 गाड्या रद्द; जाणून घ्या सविस्तर वृत्त

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -