घरदेश-विदेशकेंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

Subscribe

केंद्रीय लोकसेवा आयोगातील(UPSC)नागरी सेवा पूर्व परीक्षा दि.  २७ जून २०२१ रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया गुरुवारपासून सुरू झाली. अर्ज करण्याची अंतिम मुदत २४ मार्चपर्यंत आहे. त्यामुळे उमेदवाराला २४ मार्च सायंकाळी ६ वाजेपर्यंत शेवटचा अर्ज करता येणार आहे. या नागरी सेवेची मुख्य परीक्षा १७ सप्टेंबर २०२१ ते २२ सप्टेंबर २०२१ दरम्यान होणार आहेत. नागरी सेवा आयोगमध्ये ७१२ जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
त्याचप्रमाणे केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फेतच घेण्यात येणाऱ्या भारतीय वन सेवा पूर्व परीक्षेची तारीखही जाहीर झाली आहे. भारतीय वन सेवा परीक्षांसाठी २४ मार्च २०२१ सायंकाळी ६ पर्यंत शेवटचा अर्ज करता येणार आहे. या विभागाची पूर्व परीक्षा २७ जून २०२१ ला होणार आहे. तर मुख्य परीक्षा नोव्हेंबर २०२१ दरम्यान होणार आहे. या दोन्ही पदासाठी नोकरीचे ठिकाणं संपूर्ण भारतभर कुठेही असणार आहे. अशी अधिकृत माहिती केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) वेबसाईटवर देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे इच्छिक उमेदवाराला अर्ज करायाचा असल्यास यासाठी वयाची अट, शैक्षणिक पात्रता, आणि एकंदरीच अर्जाची प्रक्रिया वेबसाईटवर देण्यात आली आहे. याची वेबसाईटची लिंक खाली दिलेली आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाची अधिकृत वेबसाईट – 

https://www.upsc.gov.in/

 

- Advertisement -

१) नागरी सेवा परीक्षा – 

https://www.upsc.gov.in/examinations/Civil%20Services%20%28Preliminary%29%20Examination%2C%202021

२)भारतीय वन सेवा परीक्षा – 

https://www.upsc.gov.in/examinations/Indian%20Forest%20Service%20%28Main%29%20Examination%2C%202020

- Advertisement -

या परीक्षेसाठी देशभरातून लाखो उमेदवार बसतात. त्यामुळे आता पूर्व परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्याने उमेदवारांना अभ्यासाची तयारी करणे शक्‍य झाले आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -