घरदेश-विदेशUPSC Final Result 2022 : इशिता किशोरने केले टॉप; पहिल्या तीनमध्ये मुलींनी...

UPSC Final Result 2022 : इशिता किशोरने केले टॉप; पहिल्या तीनमध्ये मुलींनी मारली बाजी

Subscribe

नवी दिल्ली : यूपीएससीने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर नागरी सेवा परीक्षा 2022 चा निकाल आज (23 मे) जाहीर केला आहे. इशिता किशोरने सीएसई 2022 मध्ये पहिल्या क्रमांकाने पास झाली आहे. दुसऱ्या क्रमांकावर गरिमा लोहिया आणि तिसऱ्या क्रमांकावर उमा हरती एन. आहे, तर चौथा क्रमांक मयूर हजारिका आणि पाचवा क्रमांक रत्न नव्या जेम्सने मिळविला आहे. यूपीएससी नागरी सेवा परीक्षेच्या अंतिम मुलाखत फेरीत बसलेले विद्यार्थी upsc.gov.in आणि upsconline.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचा यूपीएससी 2022 चा अंतिम निकाल पाहू शकतात.

यूपीएससीची मुख्य परीक्षा 16 ते 25 सप्टेंबर 2022 या कालावधीत पार पडली होती. नागरी सेवा प्राथमिक आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सुमारे 2,529 उमेदवारांना मुलाखतीच्या टप्प्यासाठी बोलावण्यात आले होते. यातील अंतिम निकालात एकूण 933 उमेदवारांची नियुक्तीसाठी निवड करण्यात आली आहे. यापैकी 345 उमेदवार अनारक्षित, 99 ईडब्लूएस, 263 ओबीली, 154 एससी आणि 72 एसटी प्रवर्गातील आहेत. 178 उमेदवारांची राखीव यादीही तयार करण्यात आली आहे. आएएस पदांवर 180 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.

- Advertisement -

दरम्यान, यूपीएससी नागरी सेवा परीक्षेच्या मुलाखतीच्या फेरी 30 जानेवारीपासून सुरू झाल्यानंतर 18 एप्रिलपर्यंत चालल्या होत्या. नागरी सेवा परीक्षा 2022 अंतर्गत यूपीएससीने IAS, IPS सह सेवांमध्ये 1011 रिक्त जागा भरल्या जातील. UPSC नागरी सेवा परीक्षेच्या सर्व फेऱ्या पार केल्यानंतर विद्यार्थ्यांना एक वर्षाच्या प्रशिक्षणासाठी पाठवले जाईल. UPSC भारती 2022 साठी 2 जानेवारी ते 22 जानेवारी 2022 या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते आणि देशभरातील विद्यार्थ्यांनी त्यासाठी अर्ज केले होते.

UPSC अंतिम निकाल 2022 असा डाउनलोड करावा
1) यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जा.
2) वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर उपलब्ध असलेल्या नेव्हिगेशन मेनूमधून “परिणाम” किंवा “रिझल्ट” विभाग निवडा.
3) याठिकाणी तुम्हाला विविध परीक्षांच्या निकालाची लिंक दिसेल. तुम्हाला “नागरी सेवा परीक्षा” किंवा “CSE” साठी क्लिक केल्यावर निकालाची लिंक निवडावी लागेल.
4) निकालाच्या लिंकवर क्लिक करा आणि पीडीएफ फाइल डाउनलोड होईल.
5) डाउनलोड फाइल तुमच्या सिस्टममधून उघजून पाहू शकतात.

- Advertisement -

सविस्तर बातमी लवकरच

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -