घरदेश-विदेशUPSC उमेदवारांसाठी खूशखबर; आता 'या' अॅपमधून मिळणार भरती आणि परीक्षेसंदर्भात प्रत्येक माहिती

UPSC उमेदवारांसाठी खूशखबर; आता ‘या’ अॅपमधून मिळणार भरती आणि परीक्षेसंदर्भात प्रत्येक माहिती

Subscribe

नवी दिल्ली: यूपीएससीद्वारे घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षा आणि भरती प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने उमेदवारांच्या सोयीसाठी एक अॅप लाँच केले आहे. UPSC Official App असं या अधिकृत अॅपचे नाव आहे. उमेदवार मोबाईलवर हे अॅप इन्स्टॉल करून काही मिनिटांत भरती आणि परीक्षांशी संदर्भातील माहिती मिळवू शकता. हे अॅप गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करता येते.

मात्र हे लक्षात घेण्यासारखे आहे की, या अॅपमधून उमेदवारांना UPSC साठी अर्ज भरण्याची परवानगी देत नाही. याबाबत UPSC ने अधिकृत अधिसूचना देखील जारी केली आहे. उमेदवार आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन संबंधित नोटीफिकेशन चेक करु शकतात.

- Advertisement -

अॅप लॉन्च करण्यासाठी उमेदवारांनी प्रथम त्यांच्या मोबाइल डिव्हाइसवर Google Play Store ला भेट देणे आवश्यक आहे. यानंतर सर्चबारवर जाऊन UPSC – अधिकृत अॅप” सर्च करा आणि त्यावर क्लिक करा. आता UPSC लोगोसह APP दिसेल. आता ‘इन्स्टॉल’ बटणावर क्लिक करा. आता एकदा डाऊनलोड झाल्यावर तुम्हाला स्क्रीनवर “ओपन” हा पर्याय दिसेल. त्यानंतर, उमेदवार विविध परीक्षांचे वेळापत्रक तपासू शकतात.

UPSC उमेदवारांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. या अॅपद्वारे त्यांना परीक्षा आणि भरतीशी संबंधित अधिकृत आणि प्रामाणिक माहिती मिळू शकते. तसेच ते त्यांना केवळ अधिकृत माहितीमध्ये प्रवेश करण्यास आणि चुकीच्या माहितीपासून दूर राहण्याची अनुमती देईल. परीक्षेचे वेळापत्रक आणि नवीनतम भरती मोहिमेबद्दल जाणून घेण्यासाठी उमेदवारांना आता अॅपवरील नवीनतम सूचना तपासत राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.


पंतप्रधान मोदींकडून सूरतेला मोठं गिफ्ट; 3400 कोटींच्या नव्या प्रकल्पांचे केले उद्घाटन


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -