घरदेश-विदेशUPSC 2020: केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर

UPSC 2020: केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर

Subscribe

ज्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली ते आता नागरी सेवा (Civil Services) पूर्व परिक्षा व भारतीय वन सेवा (Indian Forest Services) पूर्व परीक्षेचा निकाल ऑफिशियल वेबसाईट upsc.gov.in किंवा upsconline.nic.in वर जाऊन पाहू शकतात

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) आपल्या अधिकृत वेबसाइटवर यूपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२० व भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा २०२० चा निकाल जाहीर केला आहे. परीक्षेनंतर अवघ्या १९ दिवसात निकालाची घोषणा यूपीएससीने केली आहे. शुक्रवारी २३ ऑक्टोबर २०२० रोजीच या निकालाची घोषणा करण्यात आली आहे.

यूपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२० ही ४ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली होती. ज्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली ते आता नागरी सेवा (Civil Services) पूर्व परिक्षा व भारतीय वन सेवा (Indian Forest Services) पूर्व परीक्षेचा निकाल ऑफिशियल वेबसाईट upsc.gov.in किंवा upsconline.nic.in वर जाऊन पाहू शकतात. दरम्यान जे विद्यार्थी यूपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षा व भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. ते आता मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. या परीक्षेबाबतची माहिती मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी यूपीएससीची अधिकृत वेबसाइट वेळोवेळी पाहत रहावी, असे सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

यूपीएससी पूर्व परीक्षा २०२० साठी १० विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले होते. परीक्षा नियमांनुसार जे विद्यार्थी या पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेत त्यांचा निकाल घोषित केला आहे. आता या विद्यार्थ्यांना  यूपीएससी सिव्हिल सेवा मुख्य परीक्षा २०२० साठी विस्तृत फॉर्म भरायचा आहे.  हा फॉर्म यूपीएससीच्या ऑफिशियल वेबसाईट वर २८ ऑक्टोबर २०२० ते ११ नोव्हेंबर २०२० च्या सायंकाळी ६ वाजेपर्यंत विद्यार्थी भरु शकतील. तर या पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची मुख्य परीक्षा ८ जानेवारी २०२१ रोजी  होणार आहे.  यूपीएससी सिव्हिल सेवा मुख्य परीक्षा २०२० साठी अॅडमिट कार्ड आणि परीक्षेचे वेळापत्रक परीक्षेच्या आधी ३-४  आठवडे येण्याची शक्यता आहे.


धक्कादायक! शिवडीत रुग्णालयाच्या शौचालयात सापडला Corona रुग्णाचा कुजलेला मृतदेह

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -