घरदेश-विदेशUPSC Ishita Kishore : 'वडील एअरफोर्समध्ये असल्यामुळे देशसेवेची पहिल्यापासूनच इच्छा'

UPSC Ishita Kishore : ‘वडील एअरफोर्समध्ये असल्यामुळे देशसेवेची पहिल्यापासूनच इच्छा’

Subscribe

नवी दिल्ली : यूपीएससी सिव्हिल सर्विसेस 2022 परीक्षेत संपूर्ण देशात पहिला क्रमांक इशिता किशोर (Ishita Kishore) हिने पटकावला  आहे. पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन्स हे पर्यायी विषय घेऊन तिने चांगल्या गुणांनी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. ती दिल्ली विद्यापीठाच्या श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समधून अर्थशास्त्र (ऑनर्स) मध्ये पदवीधर झाली आहे.

इशिता किशोरचे वडील एअरफोर्समध्ये अधिकारी आहेत आणि संपूर्ण कुटुंब ग्रेटर नोएडामध्ये राहते. ती नेहमीच चांगला अभ्यास करून टॉपर राहण्याचा प्रयत्न करत होती. इशिताने 2014 मध्ये एअरफोर्स बाल भारतीमधून 12 वी इयत्ता पूर्ण केली आणि त्यानंतर तिने 2017 मध्ये श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समधून इकॉनॉमिक्स ऑनर्ससह पदवी पूर्ण केली.

- Advertisement -

वडिलांमुले आयएएस होण्याचे ठरवले
यूपीएससी परीक्षेतील इशिताचा हा तिसरा प्रयत्न होता. त्यामुळे आज निकालाची वाट पाहत असताना ऑल इंडिया टॉपर होईल याची तिला कल्पना नव्हती. परंतु निकाल लागताच तिचे नाव सर्वत्र पसरले. ही गोष्ट तिने आईला सांगितल्यावर तीलाही आनंद झाला. टॉपर झाल्यानंतर इशिताला सांगितले की, मी माझ्या वडिलांना नेहमीच देशसेवेसाठी तत्पर राहताना पाहिले आहे. त्यामुळे लहानपणीच विचार केला होता की, मी मोठी झाल्यावर देशहितासाठी काम करेन, जेणेकरून मला माझ्या वडिलांप्रमाणे देशाची सेवा करता येईल.

यूपीएससीसाठी घरूनच अभ्यास
इशिताने सांगितले की, यूपीएससीसाठी घरूनच अभ्यास केला. राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध हे तिचे ऑपशनल विषय होते. टॉपर झाल्यानंतर इथिताने सांगितले की, मुलाखतीदरम्यान सर्व उमेदवारांच्या अपेक्षा माझे सिलेक्श व्हावे. मी सुद्धा मुलाखतीवेळी खूप मेहनत केली होती, त्यामुळे मला खात्री होती की, मी या वेळी नक्की पास होईल.

- Advertisement -

यूपीएससी सिव्हिल सर्विसेस 2022 निकाल जाहीर
यूपीएससी सिव्हिल सर्विसेस 2022 परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत पहिल्या 4 टॉपर मुली आहेत. पहिला क्रमांक इशिता किशोरने पटकावला असून तिच्याशिवाय गरिमा लोहिया दुसऱ्या क्रमांकावर, उमा हर्थी एन तिसऱ्या आणि स्मृती मिश्रा चौथ्या क्रमांकावर आहे. या परीक्षेसाठी एकूण 11,35,697 उमेदवारांनी अर्ज केले होते, त्यापैकी 5,73,735 उमेदवार परीक्षेला बसले होते. सप्टेंबर 2022 मध्ये होणाऱ्या लेखी (मुख्य) परीक्षेत एकूण 13,090 उमेदवार बसण्यास पात्र ठरले होते. एकूण 2,529 उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले होते. त्यानंतर आज (23 मे) अंतिम निकाल जाहीर झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -