घरदेश-विदेशUPSC NDA 2 2021: UPSC कडून १४ नोव्हेंबरला होणाऱ्या NDA, NA II...

UPSC NDA 2 2021: UPSC कडून १४ नोव्हेंबरला होणाऱ्या NDA, NA II परीक्षेसाठीचे नियम जारी

Subscribe

UPSC NDA 2 2021: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) १४ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या नॅशनल डिफेंस अकॅडमी (NDA) आणि नेवल अकॅडमी (NA II) परीक्षांसाठीच्या केंद्रांची यादी जाहीर केली आहे. यासाठी खालील दिलेल्या लिंकच्या माध्यमातून विद्यार्थी आपल्या शहराचे नाव तपासू शकतात. विशेष म्हणजे यंदा पहिल्यांदाच महिलांना देखील या परीक्षांमध्ये सहभागी होण्याची संधी देण्यात आली आहे.

‘या’ शहरांमध्ये आहेत परीक्षा केंद्रे

आगरतळा, अहमदाबाद, आयझॉल, प्रयागराज (इलाहाबाद), बंगलुरु, बरेली, भोपाळ, चंदीगड, चेन्नई, कटक, डेहराडून, दिल्ली, धारवाड, दिसपूर, गंगटोक, हैदराबाद, इंफाळ, इटानगर, जयपूर, जम्मू, जोरहाट, कोची, कोहिमा, कोलकात्ता , लखनौ, मदुराई, मुंबई, नागपूर, पणजी (गोवा), पाटणा, पोर्ट ब्लेअर, रायपूर, रांची, संबलपूर, शिलाँग, शिमला, श्रीनगर, तिरुवनंतपुरम, तिरुपती, उदयपूर आणि विशाखापट्टणम अशा शहारांमध्ये परीक्षांचे आयोजन करण्यत आले आहे.

- Advertisement -

UPSC ने १४ नोव्हेंबर २०२१ रोजी NDA (2) २०२१ च्या परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांसाठी कोरोना संसर्गाचा प्रसार टाळण्यासाठी कठोर प्रोटोकॉल लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. अशा परिस्थितीत, UPSC NDA आणि NA II 2021 परीक्षेसाठी जारी केलेल्या सूचना खाली वाचता येतील.

सर्व उमेदवारांसाठी मास्क/फेस कव्हर घालणे अनिवार्य आहे. मास्क/फेस कव्हर नसलेल्या उमेदवारांना केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. तथापि, परीक्षा अधिकाऱ्यांनी आवश्यकतेनुसार पडताळणीसाठी उमेदवारांना त्यांचा मास्क काढावा लागणार आहे. याशिवाय उमेदवार आपल्यासोबत पारदर्शक सॅनिटायझरची बॉटल घेऊन जाऊ शकतो.

- Advertisement -

उमेदवारांना कोरोना नियमांचे पालन करण्याबरोबरचं खोलीमध्ये आणि केंद्र परिसरात सोशल डिस्टंसिंग, व्यक्तिगत स्वच्छतेचे पालन करणे गरजेचे आहे.

ई-अॅडमिट कार्डसाठी ‘या’ लिंकवर करा क्लिक

  1. https://upsconline.nic.in/eadmitcard/admitcard_NDAII_2021/forgot_rid.php#hhh1
  2. https://upsconline.nic.in/eadmitcard/admitcard_NDAII_2021/

परीक्षा हॉलमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रत्येक सत्रात उमेदवारांना ई-अॅडमिट कार्डसह ओळखपत्र घेऊन जाणे अनिवार्य आहे. जर ई-अॅडमिट कार्डवरील फोटो नसेल किंवा फोटो धुरकट दिसत असेल तर उमेदवारांना दोन समान फोटो घेऊन जाण्याची परवानगी असेल.

जर ई-अॅडमिट कार्डमध्ये विसंगती दिसल्यास उमेदवारांनी तात्काळ [email protected] या ई-मेल आयडीवर माहिती द्यावी लागेल.


petrol diesel price : कच्च्या तेलाचे दर घसरले; पेट्रोल, डिझेल होणार सर्वाधिक स्वस्त?


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -