घरदेश-विदेशमजुराचा चहावाला मुलगा बनला आयएएस; प्रेरणादायी कहाणी Viral

मजुराचा चहावाला मुलगा बनला आयएएस; प्रेरणादायी कहाणी Viral

Subscribe

फेसबुकवर हिमांशू गुप्तांची कहाणी वाचल्यानंतर यूजर्स त्यांचे कौतुक करत आहेत. त्यांच्या मेहनतीला आणि जिद्दीला लोक सलाम करत आहेत.

UPSC Success Strory : एका आयएएस (IAS Officer) अधिकारी ज्यांनी आपले बालपण अत्यंत गरिबीत घालवले, तर शालेय शिक्षण पूर्ण करण्यासाठी दररोज 70 किमीचा पायी प्रवास केला. एवढेच नाही तर मजूर वडिलांना मदत करण्यासाठी त्यांनी वेळे प्रसंगी चहाच्या दुकानात कामही केले. पण त्यांनी कधीच हार मानली नाही. आयएएस हिमांशू गुप्ता यांची ही प्रेरणादायी कहाणी आहे.

उत्तराखंडचे हिमांशू गुप्ता मेहनतीच्या जोरावर UPSC परीक्षा उत्तीर्ण झाले आणि IAS अधिकारी बनले. पण त्यांची कहाणी इतकी सोप्पी नव्हती. प्रतिकूल परिस्थितीतही काहीतरी करून दाखवण्याची जिद्द, धाडस आणि ध्यास या जोरावर त्यांनी आपली स्वप्न पूर्ण केली. UPSC उत्तीर्ण करून IAS झालेल्या हिमांशू गुप्तांचे पालक कमी शिकलेले आहेत. वडील रोजंदारीवर मजूर म्हणून काम करायचे. तर घरची आर्थिक परिस्थिती सांभाळण्यासाठी चहाचे दुकान चालवायचे. अशा परिस्थितीतही मुला-मुलींना शिकवणार हे त्यांनी निश्चित केले.

वडील चहाचे दुकान चालवायचे

 

View this post on Instagram

 

A post shared by Himanshu Gupta (@himanshugupta_ias)

- Advertisement -


‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ या फेसबुक पेजवर आपली कहाणी सांगताना हिमांशू गुप्ता म्हणाले की- ‘मी शाळेत जाण्यापूर्वी आणि शाळा सुटल्यानंतर माझ्या वडिलांसोबत काम करायचो. शाळा 35 किमी अंतरावर होती, येता-जाता असा 70 किमीचा प्रवास रोज करावा लागायचा. यात जेव्हा जेव्हा माझे वर्गमित्र आमच्या चहाच्या स्टॉलजवळून जायचे तेव्हा मी लपत असे. पण एकदा कोणीतरी मला पाहिले आणि माझी चेष्टा करायला सुरुवात केली. मला ‘चहावाला’ म्हणून चिडवायचे. पण याकडे दुर्लक्ष करत मी अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. जेव्हा-जेव्हा वेळ मिळायचा तेव्हा वडीलांना मदत करायचो. घर चालवण्यासाठी आम्ही दिवसाला 400 रुपये मिळवायचो.

हिमांशू गुप्ता पुढे सांगतात ‘माझी स्वप्ने खूप मोठी होती. एका शहरात राहून माझ्या कुटुंबाना चांगले जीवन देण्याचे स्वप्न पाहत होतो. वडील अनेकदा म्हणायचे, ‘स्वप्न साकार करायचे असेल तर अभ्यास कर!’ मी तेच केले. मला माहीत होते की, जर मी खूप अभ्यास केला तर मला नामांकित विद्यापीठात प्रवेश मिळेल. पण मला इंग्रजी येत नव्हते, म्हणून मी इंग्रजी चित्रपटांच्या डीव्हीडी विकत घ्यायचो आणि शिकण्यासाठी त्या बघायचो.’

- Advertisement -

पुढे ते म्हणतात, मी माझ्या वडिलांचा 2G कनेक्शन असलेला जुना फोन वापरून कॉलेज सर्च करायचो आणि अर्ज करायचो. सुदैवाने मला बोर्डात चांगले गुण मिळाले आणि मला हिंदू कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. माझ्या घरच्यांना कॉलेजबद्दल काहीच माहिती नव्हते, तरीही ते म्हणाले, ‘आम्हाला तुमच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे!’

विद्यापीठात अव्वल येताच नागरी सेवा परीक्षेची तयारी सुरू केली

हिमांशू गुप्ता पुढे सांगतात, ‘पण मी घाबरलो होतो; आत्मविश्वासाने बोलणाऱ्या आणि पुढे जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मी अपरिचित होतो. पण माझ्यात एक गोष्ट होती ज्याने मी वेगळा ठरलो. ती म्हणजे शिकण्याची भूक! मी माझ्या कॉलेजची फी देखील स्वतः भरली आहे, कारण मला माझ्या पालकांवर ओझे बनायचे नव्हते – मी खाजगी शिकवण्या दिल्या आणि ब्लॉग लिहिले. 3 वर्षांनंतर मी माझ्या कुटुंबात पदवीधर होणारी पहिली व्यक्ती बनलो. त्यानंतर मी माझ्या विद्यापीठात अव्वल ठरलो. त्यामुळे मला परदेशात पीएचडी करण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली. पण ती मी नाकारली कारण मी माझ्या कुटुंबाला सोडू लांब राहू शकत नव्हतो. पण हा सर्वात कठीण निर्णय होता, पण हा निर्णय घेतला आणि नागरी सेवेत Civil Service) रुजू होण्याचा निर्णय घेतला.

तिसऱ्यांदा पास झाले UPSC परीक्षा

हिमांशू गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना यूपीएससीच्या पहिल्या प्रयत्नात कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय अपयश आले, परंतु आयएएस अधिकारी बनण्याचा त्यांचा संकल्प अधिक दृढ झाला. मग त्यांनी दुप्पट मेहनत घेतली आणि आणखी 3 प्रयत्न केले. परीक्षा उत्तीर्ण झाले पण त्यांना रँक मिळाला नाही. पण चौथ्या प्रयत्नानंतर ते शेवटी आयएएस अधिकारी झालेच. तेव्हा त्यांची आई म्हणाली- ‘बेटा, आज तू आमचं नाव राखलंस. यावर हिमांशू गुप्ता सांगतात की, माझा पहिला पगार आई-वडिलांच्या हातात देतानाचा तो एक संस्मरणीय क्षण होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Himanshu Gupta (@himanshugupta_ias)

यूपीएससी परीक्षा तीनदा उत्तीर्ण

हिमांशू गुप्ता 2018 मध्ये पहिल्यांदा UPSC परीक्षा उत्तीर्ण झाले, त्यानंतर त्यांची भारतीय रेल्वे परिवहन सेवा (IRTS) साठी निवड झाली. त्यांनी 2019 मध्ये पुन्हा परीक्षा दिली आणि दुसऱ्या प्रयत्नात त्यांची भारतीय पोलीस सेवेसाठी (IPS) निवड झाली. आणि त्यानंतर 2020 मध्ये तिसऱ्या प्रयत्नात त्याची भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) निवड झाली.

युजर्सकडून हिमांशू गुप्तांचे कौतूक

फेसबुकवर हिमांशू गुप्तांची कहाणी वाचल्यानंतर यूजर्स त्यांचे कौतुक करत आहेत. त्यांच्या मेहनतीला आणि जिद्दीला लोक सलाम करत आहेत.


समाजवादी पक्षाची मान्यता धोक्यात! सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -