डोक्यात हातोडा घालून बापाकडून ३ मुलींचा खून

पत्नी माहेरी गेली म्हणून पतीनं ३ मुलींचा खून केल्याची धक्कादायक घटना उत्तरप्रदेशात घडली आहे. पोलिसांनी आरोपीला अचक देखील केली आहे.

Man killed his sister's husband over love marriage in beed
बीडमध्ये भर रस्त्यात बहिणीच्या नवऱ्याची हत्या

क्रुरकर्मा बापनं ३ मुलींचा खून केल्यानं उत्तरप्रदेश राज्य हादरून गेलं आहे. माहेरी गेलेली बायको परत घरी यासाठी बापानं आपल्या पोटच्या गोळ्यांचा खून केला. त्यांची डोकी छाटली. या हादरवणाऱ्या घटनेनं पोलिसांनी खूनी बापाला अटक  केली असून त्याची रवानगी जेलमध्ये करण्यात आली आहे. अंजली वय वर्षे ११, राधिका वय वर्षे ७ आणि विशाखा वय वर्षे ३ अशी या दुर्दैवी मुलींची नावं आहेत. दरम्यान, चिंदु कुशवाह असं या क्रुरकर्मा बापाचं नाव आहे. आरोपी चिंदु कुशवाहनं आपला गुन्हा कबुल केला असल्याची माहिती ललितपूरच्या पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

काय आहे प्रकरण

दिवाळीपूर्वी चिंदु कुशवाह दारू पिऊन घरी आला. त्यानंतर चिंदु आणि त्याच्या पत्नीमध्ये जोरात वाद झाला. यावेळी चिंदुनं पत्नीला मारहाण  देखील केली. परिणामी दुसऱ्या दिवशी सकाळी पत्नीनं आपल्या माहेरचा रस्ता धरला. त्यानंतर चिंदुनं सासरी जात बायकोला परत येण्याची विनंती केली. पण बायकोनं ठाम नकार दिला. त्यानंतर पत्नीचा चुलत भाऊ आणि चिंदुमध्ये जोरदार भांडण झालं. त्यात चिंदुला मारहाण देखील झाली. अखेर अपमान सहन झाल्यानं चिंदु घरी आला. यावेळी काहीही करून बायकोला परत आणायचं हा निश्चय त्यानं केला होता. त्यासाठी वाटेल ती किंमत मोजण्याची देखील त्याची तयारी होती.

एके दिवशी चिंदु दारू पिऊन घरी आला. रात्रभर दारू प्यायला आणि पहाटे ४ वाजता त्यांनं आपल्या आई – वडिलांना घरातून बाहेर जाण्यास सांगितले. दरम्यान, आई – वडिलांच्या मनात देखील शंकेची पाल चुकचुलली. शिवाय, ज्या गोष्टीची भीती वाटत होती. तिच गोष्ट घडली. चिंदुनं आपल्या पोटच्या गोळ्यांचा खून केला. तिनही मुलीच्या डोक्यात हातोड्यानं हल्ला करत तिनही मुलींना झोपेतच कायमचं शांत केलं. मुलींना संपवल्यानंतर पत्नी परत येईल अशी आशा चिंदुला होती. पण, चिंदुची रवानगी झाली ती थेट जेलमध्ये. या साऱ्या घटनेनं संपूर्ण उत्तरप्रदेश राज्य हादरून गेलं आहे.

वाचा – मद्यपान करुन धिंगाणा घालतो म्हणून केला खून