Pulses : डाळीच्या किंमतीत मोठी घट, केंद्र सरकारची आकडेवारी जाहीर

PULSE

केंद्र सरकारने डाळींशी संबंधित एक महत्वपूर्ण अशी माहिती दिली आहे. शुक्रवारी जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार डाळींची किंमत कमी झाली आहे. घरगुती डाळींच्या उपलब्धतेसाठी प्रोत्साहन देण्यासाठी तसेच आवश्यक खाद्य वस्तुंच्या किंमती स्थिर ठेवण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात उडीद डाळींच्या किंमतीत पाच टक्के घट झाल्याची माहिती केंद्राने प्रसिद्ध केली आहे.

ग्राहक संरक्षण विभागाच्या आकेडवारीनुसार उडीद डाळीची प्रति क्विंटर किंमत २५ फेब्रुवारी २०२२ च्या अहवालानुसार प्रति क्विंटल ९ हजार ४१० रूपये इतकी आहे. ही किंमतीतील ४.९९ टक्के घट दाखवते. याआधी २४ फेब्रुवारी २०२२ रोजी उडीद डाळीचा सरासरी प्रति क्विंटल दर हा ९ हजार ४४४ रूपये होता. ही किंमत २४ फेब्रुवारी २०२१ रोजी ९ हजार ८९६ रूपये प्रति क्विंटल होती.

डाळीच्या साठवणुकीच्या कमाल मर्यादा निश्चित
मे २०२१ मध्ये राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना खाद्य पदार्थांच्या वस्तुंच्या किंमतींचे निरीक्षण करण्याचे तसेच आवश्यक वस्तुंच्या अधिनियमाअंतर्गत मिल मालक, आयात करणारे लोक तसेच व्यापाऱ्यांद्वारे खरेदी करण्यात आलेल्या स्टॉकच्या किंमती निश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मूग डाळ वगळता इतर सर्व डाळींच्या स्टॉकवर जुलै २०२१ रोजी अधिसूचित करण्यात आले होते.

१९ जुलै २०२१ रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार काही डाळींच्या आयातीच्या निमित्ताने आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामध्ये चार डाळींमध्ये विशेषतः उडीद, मसूर, चणा, तूर डाळींसाठी ३१ ऑक्टोबर २०२१ पर्यंतच्या कालावधीसाठी स्टॉक करण्यासाठीची अट घालण्यात आली. त्यानंतर सरकारने १५ मे २०२१ ते ३१ ऑक्टोबर २०२१ पर्यंत मुक्त श्रेणीअंतर्गत तूर, उडीद आणि मूग डाळीच्या आयातीसाठी परवानगी दिली. त्यानंतर तूर आणि उडीद डाळीच्या आयातीसाठी मुक्त व्यवस्थेच्या कालावधीसाठी ३१ मार्च २०२२ पर्यंत वाढवण्यात आले.

आयातीच्या उपाययोजना आणि नियोजनामुळे गेल्या दोन वर्षाच्या कालावधीच्या तुलनेत तूर, उडीद, मूग आयातीमध्ये वाढ झाली आहे. त्यामध्ये उडीद डाळीची सरासरी विक्री किंमती एकाच वर्षात पाच टक्क्यांनी घटली आहे. याचा परिणाम हा खाद्याशी संबंधित महागाईवरही झाला आहे.