घरताज्या घडामोडीUri Operation: उरीत सापडला १९ वर्षीय दहशतवादी; पैशांच्या लालसेपोटी लष्कर-ए-तोयबामध्ये झाला होता...

Uri Operation: उरीत सापडला १९ वर्षीय दहशतवादी; पैशांच्या लालसेपोटी लष्कर-ए-तोयबामध्ये झाला होता सामील

Subscribe

भारतीय लष्कराने जम्मू-काश्मीरमधील उरी येथील दहशतवाद्यांचा कट उधळला आहे. २०१६मध्ये झालेल्या सर्जिकल स्ट्राईकच्या वर्षपूर्तीच्या अगोदर पाकिस्तानकडून काही दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते, मात्र भारतीय लष्कराला त्यांचा हा कट उधळण्यात यश आले. तसेच या कारवाईमधील मोठे यश हे आहे की, लष्कर-ए-तोयबाचा एक दहशतवादी भारतीय लष्कराच्या हाती जिवंत सापडला आहे.

मंगळवारी दुपारी या पूर्ण ऑपरेशनची माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली. १८-१९ सप्टेंबरला हे ऑपरेशन सुरू झाले होते. त्यावेळेस पॅट्रोलिंग दरम्यान जवानांना बॉर्डरवर पाकिस्तानकडून दहशतवादी घुसखोरी करताना दिसले होते.

- Advertisement -

जिवंत पकडलेला दहशतवादी कोण आहे?

गेल्या सात दिवसांत सात दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. ज्या दहशतावाद्याला जिवंत पकडले आहे, त्याचे वय १९ वर्ष आहे. या दहशतवाद्याचे नाव अली बाबार असे आहे, जो लष्कर-ए-तोयबाचा आहे.पाकिस्तानच्या पंजाबच्या दिपलपुरमधील वासेववाला गावातील दहशतवादी अली बाबर सातवी पर्यंत शिकला आहे. परंतु एवढ्या कमी वयात तो दहशतवादी रस्त्यावर उतरला आणि सरळ भारतमध्ये ऑपरेशन करण्यासाठी आला.

माहितीनुसार, २५ सप्टेंबरला या ऑपरेशन दरम्यान पाकिस्तानी दहशतवादी अतीक उर रहमानला ठार मारले होते. त्यानंतर त्याच्या सोबत असलेला अली बाबरने शरणागती पत्करली. याने सर्व सहा दहशतवादी पाकिस्तानच्या पंजाबमध्ये राहणारे असल्याची माहिती दिली.

- Advertisement -

अली बाबर वडिलांच्या निधनानंतर लष्कर-ए-तोयबामध्ये सामील झाला होता. त्याच्या घरी आई, बहिण आहे. २०१९मध्ये अली बाबरने खैबर पख्तनूवामध्ये ट्रेनिंग घेतली होती. अली बाबरने सांगितले की, अतीक उर रहमानने त्याच्या आईच्या उपचारासाठी २० हजार रुपये देईल असे सांगितले होते. तसेच ३० हजार परत आल्यावर देणार होते.


हेही वाचा – Uri operation : जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला, एका दहशतवाद्याचा खात्मा, एक ताब्यात


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -