घरदेश-विदेशविमानात महिलेवर लघुशंकाप्रकरणी आरोपी शंकर मिश्राला जामीन मिळाला

विमानात महिलेवर लघुशंकाप्रकरणी आरोपी शंकर मिश्राला जामीन मिळाला

Subscribe

एअर इंडिया विमानात कित्येक वेळा प्रवाशांसह गैरवर्तवणूकीचे प्रकार घडतात. पण काही दिवसांपूर्वी जी घटना घडली ती अत्यंत घृणास्पद होती.

Air India Urination Case: एअर इंडिया विमानात कित्येक वेळा प्रवाशांसह गैरवर्तणुकीचे प्रकार घडतात. पण काही दिवसांपूर्वी जी घटना घडली ती अत्यंत घृणास्पद होती. एका ७० वर्षीय वयोवृद्ध महिला प्रवाशाच्या अंगावर नशेत असणाऱ्या सहप्रवाशाने लघुशंका केल्याची घटना एअर इंडियाच्या विमानांमध्ये घडली. याप्रकरणी आता आरोपीला जामीन मिळाल्याची माहिती समोर येत आहे. यापूर्वी सोमवारी शंकर मिश्रा यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता.

दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने आज या प्रकरणातील आरोपी शंकर मिश्रा याला जामीन मंजूर करून मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने आरोपी मिश्रा याला एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केलाय. न्यूयॉर्कहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात मद्यधुंद अवस्थेत एका महिलेवर लघुशंका केल्याचा आरोप शंकर मिश्रा यांच्यावर आहे. या प्रकरणातील आरोपींच्या जामीन अर्जाला विरोध करताना पोलिसांच्या वतीने असे सांगण्यात आले की, आरोपीच्या या कृत्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा अपमान झाला आहे. शंकर मिश्रा यांना ७ जानेवारी रोजी बेंगळुरू येथून अटक करण्यात आली होती.

- Advertisement -

शंकर मिश्रा यांच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना आरोपीने जे केले ते घृणास्पद असू शकते, अशी टिप्पणी न्यायालयाने केली होती. तो वेगळा मुद्दा आहे, पण आपण त्यात पडू नये. याला कायदा कसा हाताळतो ते पाहू. आरोपीला जामीन देण्यास विरोध करत आरोपींनी तक्रारदाराला धमकावले असल्याचेही पोलिसांनी न्यायालयाला सांगितले होते. इतर क्रू मेंबर्स आणि साक्षीदारांची उलट तपासणी झाली असल्याचे सांगत आरोपींनी जामीन मागितला होता. त्याने तिकिटाचे पैसे परत मागितले असून त्याच्यावर कारवाई करू नये, अशी विनंती केली आहे.

एअर इंडियाच्या क्रू मेंबर्सने हे प्रकरण हलकेच घेतले

१३ जानेवारी रोजी आरोपीच्या वकिलांनी दावा केला होता की, शंकर मिश्रा यांनी विमानात लघुशंका केली नव्हती, तर महिलेने स्वतःवर लघुशंका केली होती. मात्र, महिलेने आरोपी पक्षाच्या वकिलाचे हे दावे खोटे आणि निंदनीय असल्याचे म्हटले होते. महिलेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे की, फ्लाइट एआय १०२ मध्ये प्रवासादरम्यान ती झोपण्याच्या तयारीत असताना शंकर मिश्रा या मद्यधुंद प्रवाशाने त्याचवेळी तिच्या अंगावर लघुशंका केली. एअर इंडियाच्या क्रू मेंबर्सने हे प्रकरण हलकेच घेतले होते, असेही ते म्हणाले होते.

- Advertisement -

एअरलाइन्सला ३० लाख रुपयांचा दंड

टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांनी लघुशंका घटनेबद्दल माफी मागितली. या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत चार क्रू मेंबर्स आणि एका पायलटला ड्युटीवरून काढून टाकण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं होतं. तर एअरलाइन्सने शंकर मिश्रा यांच्यावर चार महिन्यांची बंदी घातली आहे. DGCA ने एअरलाईनला ३० लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. याशिवाय विमानाच्या पायलट-इन-कमांडचा परवानाही तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -