घरक्राइमविमान प्रवासात लघुशंका करणाऱ्या शंकर मिश्राला न्यायालयीन कोठडी; जामिनासाठी अर्ज

विमान प्रवासात लघुशंका करणाऱ्या शंकर मिश्राला न्यायालयीन कोठडी; जामिनासाठी अर्ज

Subscribe

दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी रात्री मंगळूरु येथून मिश्राला अटक केली. आरोग्य तपासणीनंतर त्याला शनिवारी पटियाला न्यायालयात हजर करण्यात आले. मिश्राला तीन दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी पोलिसांनी न्यायालयात केली. याप्रकरणात कोणीही सह आरोपी नाही. त्यामुळे मिश्राच्या कोठडीची आवश्यकता नाही, असे न्यायालयाने सांगितले.

नवी दिल्लीः विमान प्रवासात ज्येष्ठ महिलेवर लघुशंका करणाऱ्या शंकर मिश्राला पटियाला कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर मिश्राने जामिनासाठी अर्ज केला. त्यावर प्रत्यूत्तर सादर करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले. यावरील पुढील सुनावणी ११ जानेवारीला होणार आहे.

दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी रात्री मंगळूरु येथून मिश्राला अटक केली. आरोग्य तपासणीनंतर त्याला शनिवारी पटियाला न्यायालयात हजर करण्यात आले. मिश्राला तीन दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी पोलिसांनी न्यायालयात केली. याप्रकरणात कोणीही सह आरोपी नाही. त्यामुळे मिश्राच्या कोठडीची आवश्यकता नाही, असे न्यायालयाने सांगितले.

- Advertisement -

आरोपी व पीडित महिलेला एकमेकांसमोर बसवून ओळखपरेड करायची आहे. त्यासाठी आरोपीची कोठडी हवी आहे, असा युक्तिवाद पोलिसांनी केला. हा युक्तिवादही न्यायालयाने फेटाळून लावला. याप्रकरणात केवळ जनतेचा दबाव आहे. या दबावामुळेच मिश्राची पोलीस कोठडी हवी आहे. मात्र आम्ही कायद्याला अनुसरुनच काम करणार आहोत. कायद्यातील तरतुदींच्या विरोधात जाऊन आदेश दिले जाणार नाहीत. मिश्राच्या पोलीस कोठडीची काहीच गरज नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. मिश्रा वारंवार जबाब बदलत आहे, असा दावा पीडित महिलेच्या वकीलांनी केला. तो दावाही न्यायालयाने मान्य केला नाही.

पीडित महिलेने मिश्राला माफ केले होते. तिचे खराब झालेले कपडे धुवून दिले होते. पोलीस तक्रार न करण्याचे आश्वासन पीडित महिलेने दिले होते. त्या महिलेला नुकसान भरपाई देण्यात आली होती. तिच्या मुलीने ही भरपाई परत केली. या घटनेचा कोणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही. ऐकीव माहितीच्या आधारे हा आरोप करण्यात आला आहे, असे मिश्राच्या वकीलाने न्यायालयाला सांगितले.

- Advertisement -

गेल्यावर्षी २६ नोव्हेंबरला ही घटना घडली होती. मिश्राने विमान प्रवासात एका ज्येष्ठ महिलेवर लघुशंका केली होती. या महिलेने याची टाटा कंपनीकडे तक्रार केली. या तक्ररीमुळे मिश्राची नोकरीही गेली आहे.

प्रवासामुळे मिश्रा अटकेत

फरार मिश्राला टॅक्सी प्रवास महागात पडला. बंगळूरुमध्ये तो एका टॅक्सीने फिरत होता. या टॅक्सीचा पोलिसांनी ट्रॅक ठेवला. मैसूर येथे मिश्राचे लोकेशन पोलिसांना सापडले व त्याला अटक झाली.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -