काँग्रेसला रामराम ठोकणाऱ्या उर्मिला मातोंडकर भारत जोडो यात्रेत सहभागी, राजकीय चर्चांना उधाण

Urmila Matondkar Participated in Bharat Jodo Yatra | प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासोबत त्यांनी भारत जोडोच्या निमित्ताने पदयात्रा केली.

urmila matondkar in bharat jodo yatra

Urmila Matondkar Participated in Bharat Jodo Yatra | जम्मू – काँग्रेसला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर या आज राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सामील झाल्या होत्या. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासोबत त्यांनी भारत जोडोच्या निमित्ताने पदयात्रा केली. यासंदर्भात त्यांनी आज सकाळीच व्हिडीओ प्रसारित करून आज भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असल्याचं सांगितलं होतं.


शिवसेनेच्या नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसमधून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. २०१९ साली त्यांनी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढली. भाजपाचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांना त्यांनी कडवी फाईट दिली. परंतु, फार कमी फरकाने मातोंडकर यांचा पराभव झाला. मात्र, काँग्रेसमधील पक्षांतर्गत वादामुळे त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेचे शिवबंधन हाती बांधून घेतले.
दरम्यान, आज त्या काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे त्या पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. परंतु, राजकीय हेतुने नव्हे तर सामाजिक हेतुने आपण भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असल्याचं मातोंडकर यांनी सकाळीच स्पष्ट केलं होतं.

हेही वाचा – उर्मिला मातोंडकरचा शिवसेनेत प्रवेश

दरम्यान, भारत जोडो यात्रा सध्या अंतिम टप्प्यांत आहे. ही यात्रा सध्या जम्मूमध्ये असून तिथेही अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला आहे. कन्याकुमारी ते काश्मीर असा प्रवास करत गेलेल्या भारत जोडो यात्रेत अनेकांनी सहभाग घेतला. विविध राज्यात त्या त्या राज्यातील प्रतिष्ठीत लोक, कलाकार, राजकारणी, समाजकारणी लोकांनी भारत जोडो यात्रेत सहभाग घेऊन राहुल गांधींना पाठिंबा दर्शवला. त्यानुसार, भारत जोडो यात्रा सध्या जम्मूत आहेत. यावेळी बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि शिवसेनेच्या नेत्या उर्मिला मातोंडकर यांनीही सहभाग घेतला.


भारत जोडो यात्रा ही सामाजिक मूल्यांवर आधारित आहे. या प्रवासात भारतीयांचं खूप प्रेम, आपुलकी, श्रद्धा आणि भारतीयत्व आहे आणि हीच भारतीयत्वाची मशाल प्रत्येकाच्या मनात अशीच तेवत राहावो असंही मातोंडकर यावेळी म्हणाल्या.