घरक्राइमअमेरिकेत हिंसाचार सुरूच, दुकानातील गोळीबारात तीन जणांचा मृत्यू

अमेरिकेत हिंसाचार सुरूच, दुकानातील गोळीबारात तीन जणांचा मृत्यू

Subscribe

अमेरिकेत चीनी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी जमलेल्या दक्षिण आशियाई लोकांवर गोळीबार करण्यात आला. त्यानंतर एका भारतीय विद्यार्थ्यावर तुफान गोळीबार करण्यात आला. या घटना ताज्या असतानाच आता अमेरिकेत पुन्हा गोळीबार झाल्याची माहिती समोर येत आहे.

अमेरिकेत चीनी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी जमलेल्या दक्षिण आशियाई लोकांवर गोळीबार करण्यात आला. त्यानंतर एका भारतीय विद्यार्थ्यावर तुफान गोळीबार करण्यात आला. या घटना ताज्या असतानाच आता अमेरिकेत पुन्हा गोळीबार झाल्याची माहिती समोर येत आहे. अमेरिकेतील वॉशिंग्टन राज्यातील याकिमा शहरात असलेल्या एका सुविधा स्टोअरमध्ये गोळीबार करण्यात आला. या गोळाबारात तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. (US 3 Killed In Random Shooting At Convenience Store In Yakima Washington)

मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी एका दुकानात अचानक 21 जणांवर गोळीबार केला. या हल्ल्यानंतर हल्लेखोराने घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर गोळीबार झाल्याची माहिती मिळताच घटनास्थळी याकिमा पोलिसांनी धाव घेतली. त्यावेळी पोलिसांनी दुकानाच्या बाहेरून आणि आतून तीन जणांचे मृतदेह ताब्यात घेतले.

- Advertisement -

याकिमा हे वॉशिंग्टनमधील अंदाजे ९६,००० लोकसंख्या असलेले शहर आहे. या घटनेचा परिणाम असा झाला की 2023 च्या पहिल्या काही आठवड्यांमध्ये तोफांच्या हिंसाचाराचा सामना करण्यासाठी हा प्रदेश अमेरिकेतील सर्वात अलीकडील प्रदेश बनला. युनायटेड स्टेट्समधील नॉर्दर्न कॅलिफोर्नियामधील हाफ मून बे परिसरात दोन गोळीबार झाला. यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला. एक गंभीर जखमी झाला.

शिकागो येथे भारतीय विद्यार्थ्याला लुटण्याचा प्रयत्न झाला. विद्यार्थ्यावर गोळीबार करण्यात आला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. अमेरिकेसह भारतातही या घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. या घटनेत जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव के साईचरण असे आहे. साईचरण हा तेलंगणा येथील रहिवासी आहे. काही दिवसांपूर्वी तो शिक्षणासाठी शिकागो येथे गेला होता. तेथे त्याने अन्य भारतीय मित्रांसोबत मैत्री केली. शिकागो येथील दुकानात साईचरण खरेदीसाठी गेला होता. तेथे खरेदी करत असताना काहीजणांनी त्याच्यावर अचानक हल्ला केला. त्याला लुटण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर गोळीबार केला. या घटनेमुळे दुकानात एकच खळबळ उडाली. गोळीबारात साईचरण जखमी झाला आहे. मित्रांनी साईचरणला उपचारासाठी रुग्णालयात नेले. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

- Advertisement -

हेही वाचा – अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यावर गोळीबार, लुटण्याचाही प्रयत्न

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -