अमेरिका रशियाकडून व्हेंटिलेटर, वैद्यकीय साहित्य खरेदी करणार; ट्रम्प-पुतीन यांची फोनवर चर्चा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे पंतप्रधान व्लादिमीर पुतीन यांच्यात ३० मार्च रोजी फोनवर चर्चा झाल्यानंतर अमेरिकेने रशियाकडून व्हेंटिलेटर, वैद्यकीय साहित्य खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Trump and Putin
अमेरिका रशियाकडून व्हेंटिलेटर, वैद्यकीय साहित्य खरेदी करणार

कोरोनाच्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेले व्हेंटिलेटर, वैद्यकीय साहित्य व इतर वैयक्तिक संरक्षण उपकरणे रशियाकडून खरेदी करण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे पंतप्रधान व्लादिमीर पुतीन यांच्यात ३० मार्च रोजी फोनवर चर्चा झाली. त्यानंतर रशियाकडून वैद्यकीय साहित्य खरेदी करण्याचा हा निर्णय घेतला आहे. संपूर्ण अमेरिकेत रुग्णालयांना व्हेंटिलेटरची कमतरता भासली आहे. सध्या अमेरिकेत कोरोनाने कहर केला आहे. पुढील दोन आठवड्यात दोन लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो, असं व्हाईट हाऊसने म्हटलं आहे..

व्हाईट हाऊसच्या टास्क फोर्सचे सदस्य डेबोरा बिक्स म्हणाले, अमेरिकेतील मृत्यूची संख्या १ लाख ते २ लाखच्या दरम्यान असू शकते. दरम्यान, यापूर्वी दोन्ही देशांनी संकटाच्या वेळी एकमेकांना मदत केली आहे आणि भविष्यात पुन्हा असे होईल यात शंका नाही, असे न्यूयॉर्क राज्याच्या प्रवक्त्या मॉर्गन ऑर्टागस म्हणाल्या. आपल्या सर्वांना कोरोनाशी लढण्यासाठी एकत्र येण्याची ही वेळ आहे, असंही त्या म्हणाल्या.


हेही वाचा – कोरोनाचं संक्रमण वेगाने वाढतंय; जवळपास ५०,००० जणांचा मृत्यू होणार – WHO


जी -२० देशांनी कोरोनाव्हायरसचा पराभव करण्यासाठी एकत्र काम करण्यासाठी गेल्या आठवड्यात सहमती दर्शविली आणि आम्ही आवश्यकता असणाऱ्यांना आवश्यक ती मदत करण्यासाठी इतरांसह एकत्र काम करत आहोत. कोविड -१९ विरूद्ध जागतिक लढा देण्यासाठी अमेरिका वचनबद्ध आहे, असं ऑर्टागस यांनी म्हटलं.

वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनूसार अमेरिकात कोरोनाग्रस्तांचा आकडा २ लाख १५ हजार २१५ वर पोहोचला असून आतापर्यंत ५ हजार ११० जणांचा मृत्यू झाला आहे. तर ८ हजार ८७८ जण बरे झाले आहेत. अमेरिके सर्वाधिक रुग्ण हे न्यूयॉर्क राज्यातील आहे. एकट्या न्यूयॉर्कमध्ये कोरोनाचे ८३ हजार ९०१ रुग्ण आहेत.