घरताज्या घडामोडीPizza Deliveryसाठी आजोबांना मिळाली तब्बल ९ लाखाची टिप

Pizza Deliveryसाठी आजोबांना मिळाली तब्बल ९ लाखाची टिप

Subscribe

पिझ्झा डिलिव्हरीसाठी आजोबांना दिली ९ लाखांची टीप

बरेच जण हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर आठवणीने टीप ठेवतात. तसेच एखाद्या वेळेस घरी ऑनलाइन ऑर्डर घेऊन येणाऱ्यााही काहीजण टीप देतात. मात्र, ही टीप जास्तीत जास्त १००, २०० किंवा जास्तीत जास्त ३०० रुपये इतकी असते, म्हणजे आपण ऑर्डर केलेल्या वस्तूच्या किमतीपेक्षा कमीच असते. पण, अमेरिकेतील एका ८९ वर्षांच्या आजोबांच्या बाबतीत हे उलट झाले आहे. कदाचित त्यांना तितका पगारही नसेल इतकी त्यांना टीप मिळाली आहे आणि ते लखपती देखील झाले आहेत.

कोण आहेत हे आजोबा?

अमेरिकेच्या उटाहमध्ये डेरलिन नीवी हे आजोबा पापा जोन्स ब्रँडच्या पिझ्झाच्या डिलिव्हरीचे काम करतात. तसेच ते आठवडाभर जवळपास ३० तास पिझ्झा डिलिव्हरी करतात. दरम्यान, ते काही आठवड्यांपूर्वी ग्लॅडी वाल्डेज यांच्या घरी पिझ्झा घेऊन गेले होते. ग्लॅडीने दरवाजा उघडताच डेरलिन यांनी त्यांना हाय गॉर्जस असे म्हटले आणि ग्लॅडीचे कौतुकही केले. ग्लॅडीला हे खूपच आवडले. ग्लॅडीने आपला पती कार्लोस वाल्डेजला या डिलिव्हरी मॅनबाबत सांगितले. त्यानंतर कार्लोस यांना डेरलिन यांचा स्वभाव आणि प्रामाणिकपणा फार आवडला. त्यासोबत ते या वयातही पिझ्झा डिलिव्हरीसारखे काम करत आहेत, याचे कौतुक देखील वाटले.

- Advertisement -

टिकटॉकवर केले कौतुक

कार्लोस यांनी आपल्या दरवाजाजवळ असलेल्या कॅमेऱ्याच्या फुटेजमधील डेरलिन यांचा व्हिडीओ आपल्या टिकटॉकवर पोस्ट केला. त्यांच्या फॉलोअर्सना देखील डेरलिन आवडले. अनेकांनी त्यांना कमेंट्स देखील केल्या. तसेच वाल्डेज कुटुंबाने यानंतर कित्येक वेळा पिझ्झा ऑर्डर केला आणि त्यांनी डिलिव्हरीसाठी डेरलिन यांनाच पाठवावे, असा आग्रह देखील धरला. त्यानंतर डेरलिन ज्यावेळी यायचे तेव्हा तेव्हा त्यांचा व्हिडीओ करुन कार्लोस पोस्ट करायचे.

कार्लोस वाल्डेज यांना या डिलिव्हरी बॉयसाठी काहीतरी चांगले करायचे होते. त्यामुळे त्यांनी आपल्या टिकटॉक पेजवर क्राऊड फंडिंग सुरु करण्याचा निर्णय घेतला. फक्त २४ तासांतच एक हजार डॉलरपेक्षा अधिक पैसे जमा झाले. एकूण १२ हजार डॉलर्स जमा झाले. त्यानंतर वाल्डेज स्वत: त्यांच्या घरी गेले आणि एका रिकाम्या पिझ्झा बॉक्समधून १२००० डॉलर दिले. पिझ्झाचा बॉक्स उघडताच डेरलिन यांच्या डोळ्यात पाणी आले.

- Advertisement -

हेही वाचा – १५ ऑक्टोबरपासून शाळा पुन्हा सुरू; केंद्राकडून मार्गदर्शक सूचना जारी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -