घरदेश-विदेशबाळाला KFC मालकाचे नाव दिल्याने १५ हजार डॉलर्सचे बक्षीस

बाळाला KFC मालकाचे नाव दिल्याने १५ हजार डॉलर्सचे बक्षीस

Subscribe

KYC चे मालक हारलँड डेव्हिड यांचे नाव दिल्यामुळे पालकांना १५ हजार डॉलर्सचे बक्षीस देण्यात आले आहे. पालकांना मुलीच्या जन्मानंतर मिळाले घसघशीत बक्षीस मिळाले आहे.

जगातील अग्रगण्य चीकन सप्लायर कंपनी KFC कंपनीचे मालक कॉलोनेल हारलँड यांच्या नाववर मुलीचे नाव ठेवण्यासाठी कपंनीकडून तब्बल १५ हजार डॉलर्स (१० लाख ८७ हजार ७२५ रुपये) चे बक्षीस पालंकाना देण्यात आले आहे. पालकांनी होणाऱ्या बाळाचं नाव हारलँड ठेवावं अशी अट KFC कंपनीने ठेवली होती. आपल्या होणाऱ्या मुलाचं नाव काय ठेवाव असा प्रश्न नेहेमीच पालकांना पडतो. मात्र मुलीच्या जन्मापूर्वीच तिचे कंपनीच्या मालकावर ठेवणार असल्याचे घोषीत करण्यात आले होते. नुकतीच कंपनीच्या वतीने एका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामधील अटी पूर्ण करणाऱ्या पालकांना हे बक्षीस दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले होते.

काय होत्या स्पर्धेतील अटी

KFC कंपनीकडून नुकतेच एका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यास्पर्धेततील अटींनुसार मुलाची जन्म तारीख आणि  कंपनीचे मालकाच्या नावावर असणे गरजेचे आहे. यावर्षी ९ सप्टेंबर रोजी जन्म झालेल्या एका मुलीचे नाव हे मालकाच्या नावावर ठेवण्यात आले होते. ही स्पर्धा फक्त अमेरिकेपुरता मर्यादीत होती. विजेत्यांसाठी जवळपास आठ लाखांहून अधिक्ष बक्षीसे होते. मात्र विजेत्यांना या दोन्ही अटी पूर्ण करणे गरजेचे होते. या स्पर्धेत ‘हारलँड रोझ’ नावाची चिमुरडी विजेती ठरली. या मुलीचा फोटो कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाइटवर टाकला आहे. याच बरोबर KFC चिकनच्या पाककृतीचे गुपित असलेले काही हर्ब तिला देऊ केले आहेत.

- Advertisement -

कोण होते कॉलोनेल हारलँड?

कॉलोनेल हारलँड यांचा जन्म ९ सप्टेंबर १८९० रोजी झाला होता. त्यांना KFC चे जनक म्हणून ओळखल्या जातात. युनायटेड स्टेट्सच्या इंडियाना येथील हॅनरीव्हिले येथे त्यांचा जन्म झाला होता. KFC चिकन म्हणून आज त्यांची कंपनी जगप्रसिद्ध आहे. मात्र तिला उभारण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. एका लहान जागेवरुन त्यांनी चिकनचा व्यवसाय सुरु केला होता. त्यांनी बरीच वर्षे KFC चिकन कंपनी संभाळली. अखेर १६ डिसेंबर १९८० रोजी त्यांचे निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -