घरताज्या घडामोडीभारतासह १०० देशांमधील प्रवाशांना श्वानांसह प्रवासासाठी अमेरिकेने घातली बंदी

भारतासह १०० देशांमधील प्रवाशांना श्वानांसह प्रवासासाठी अमेरिकेने घातली बंदी

Subscribe

जगभरात अद्यापही कोरोना व्हायरसचा कहर कायम आहे. इतर देशांहून अमेरिकेत अजूनही कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक आहे. यादरम्यान अमेरिकेत रेबीज व्हायरस पसरण्याची शक्यता आहे. याच अनुषंगाने भारत, डोमिनिकन रिपब्लिक, कोलंबिया, चीन, रशिया आणि जगातील १०० हून अधिक देशातील लोकांना अमेरिकेत कुत्रा आणण्यावर बंदी घालण्यात आली आहे. (US bans dogs brought in from 100 countries with rabies risk)

अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC)ने म्हटले की, अमेरिकेला जीवघेण्या संकटातून वाचवण्यासाठी हा निर्णय तात्पुरता घेण्यात आला आहे. जगभरातून प्रत्येक वर्षाला जवळपास १० लाख कुत्रे लोकांसोबत अमेरिकेत येत असतात. आता प्रत्येक वर्षाला येणाऱ्या कुत्र्यांची संख्या एक लाखांपेक्षा कमी झाली आहे. आरोग्य विभागाच्या माहिनुसार, खूप धोका असलेल्या देशांपैकी २०२०मध्ये अमेरिकेत येणाऱ्या कुत्र्यांमध्ये गेल्या २ वर्षांच्या तुलनेत ५२ टक्क्यांनी कमी झाली आहे.

- Advertisement -

सीडीसीने पुढे म्हटले की, काही अटींसह कुत्र्यांना आणण्यास परवानगी दिली जाईल, यासाठी कुत्र्याचे वय त्याच्या फोटोवरून निश्चित केले जाईल. तसेच कुत्र्याला रेबीजची लस दिली असलेले प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे.

अमेरिकेतील सध्याची कोरोनाबाधितांची संख्या ३ कोटी ४३ लाखांहून अधिक आहे. यापैकी आतापर्यंत ६ लाख १५ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून २ कोटी ८५ लाखांहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ५१ लाख ५७ हजारांहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Coronavirus: डेल्टा व्हेरियंटमुळे लोकांना दुप्पट वेगाने होतोय कोरोनाचा संसर्ग, अभ्यासातून नवा खुलासा


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -