अमेरिकेचा चीनला मोठा धक्का; चीनच्या ३३ कंपन्यांना टाकलं काळ्या यादीत

चीनला मदत केल्याप्रकरणी अमेरिकेने चीनच्या तब्बल ३३ कंपन्यांना काळ्या यादीत टाकलं आहे.

shi jinping and donald trump

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सतत होत असलेले आरोप आणि वाढते तणाव यांच्या दरम्यान अमेरिकेने चीनला मोठा धक्का दिला आहे. अमेरिकेने ३३ कंपन्या आणि चीनच्या इतर संस्था अर्थव्यवस्थेच्या काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय घेतला आहे. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, मानवाधिकार उल्लंघन आणि अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षेसाठी ३३ चिनी कंपन्या आणि इतर संस्थांना काळ्या यादीत टाकलं जात आहे, असं अमेरिकेच्या वाणिज्य विभागाने शुक्रवारी सांगितलं.

अमेरिकेच्या वाणिज्य विभागानुसार, चीनमध्ये बिगर मुस्लिम लोकांवर पाळत ठेवण्यामुळे, सक्तीने काम करुन घेणं आणि मनमानीने लोकांना ताब्यात घेणं आणि मानवाधिकार उल्लंघनामुळे ९ कंपन्यांवर बंदी घातली जात आहे. अमेरिकन सरकारने असं म्हटलं आहे की, ७ व्यावसायिक संस्था चीनला हायटेक पाळत ठेवण्यास मदत करत आहेत. चीनच्या २४ सरकारी आणि व्यवसायिक संस्थांना काळ्या यादीत टाकलं जात आहे कारण त्यांनी सामूहिक विनाशांशी संबंधित शस्त्रे मिळवण्यासाठी आणि इतर कामांसाठी मदत केली.

या काळ्या यादीतील कंपन्या आर्टिफिशिअल इंटेलिजेन्स (एआय) आणि चेहर्यावरील ओळख (फेशिअल रेकगनाय्शन) यासारख्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करतात. इंटेल कॉर्प आणि एनव्हीडिया कॉर्पसह अमेरिकेच्या बर्‍याच मोठ्या कंपन्यांनी त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. चीनच्या काळ्या यादीतील कंपन्यांमध्ये नेटपोसा या मोठ्या चिनी एआय कंपनीचा समावेश आहे.


हेही वाचा – लॉकडाऊन काळात महाराष्ट्रात सायबर गुन्ह्यांमध्ये झपाट्याने वाढ – अनिल देशमुख


अमेरिका आणि चीन एकमेकांवर कोरोना विषाणूवरुन एकमेकांवर आरोप करत आहेत. चीनने कोरोना विषाणूची माहिती लपविली आणि यामुळे कोरोना साथीचा रोग जगात पसरला, असा आरोप अमेरिकेने केला आहे. अमेरिकेद्वारे वारंवार म्हटलं गेलं आहे की वुहानमधील लॅबमधून कोरोना विषाणूचा प्रसार झाला असावा. या विषयावर चौकशीची चर्चा देखील झाली. तथापि, चीन असे आरोप फेटाळतच आहे.