Maharashtra Assembly Election 2024
घरदेश-विदेशUS Bribery Case : त्वरित जेपीसी स्थापन करा, अदानी प्रकरणावरून काँग्रेसची पुन्हा...

US Bribery Case : त्वरित जेपीसी स्थापन करा, अदानी प्रकरणावरून काँग्रेसची पुन्हा मागणी

Subscribe

पंतप्रधान मोदी यांचे उघड संरक्षण आणि 'काहीही होणार नाही' या वृत्तीने दीर्घकाळ सुरू असलेली फसवणूक आणि गुन्ह्यांशी सुसंगत असे हे प्रकरण आहे, अशी टीका जयराम रमेश यांनी केली आहे.

(US Bribery Case) नवी दिल्ली : प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप अमेरिकेच्या सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनने केला आहे. याप्रकरणी गौतम अदानी आणि त्यांचा पुतण्या सागर अदानी यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. यावरून काँग्रेस आक्रमक झाली असून अदानी प्रकरणाच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती (JPC) स्थापन करण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला आहे. (Congress again demands immediate formation of JPC in Adani case)

माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी यासंदर्भात ट्वीट करून अदानी यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले आहे. विविध कथित घोटाळ्यांची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी काँग्रेस सातत्याने करीत असून त्याला यामुळे पुष्टि मिळाली आहे.

- Advertisement -

यूएस सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनने (एसईसी) गौतम अदानी आणि इतरांवर केलेल्या आरोपांमुळे जानेवारी 2023पासून विविध ‘मोदानी’ घोटाळ्यांची जेपीसी चौकशी करण्याच्या काँग्रेसच्या मागणीला बळ मिळाले आहे. या घोटाळ्यांचे विविध पैलू तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे आवडते भांडवलदार (अदानी) यांच्यातील घनिष्ठ संबंधांवर प्रकाश टाकणाऱ्या ‘हम अदानी के है कौन’ (HAHK) श्रृंखलेद्वारे काँग्रेसने 100 प्रश्न विचारले होते. या प्रश्नांची उत्तरे आजपर्यंत मिळालेली नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

पंतप्रधान मोदी यांचे उघड संरक्षण आणि ‘काहीही होणार नाही’ या वृत्तीने दीर्घकाळ सुरू असलेली फसवणूक आणि गुन्ह्यांशी सुसंगत असे हे प्रकरण आहे. अदानी यांची योग्य चौकशी करण्यासाठी परकीय यंत्रणांची मदत घेण्यात आली होती. यावरूनच, भारतीय यंत्रणांवर भाजपाचा कसा ताबा आहे आणि लोभी तसेच सत्तापिपासू नेत्यांनी अनेक दशकांच्या संस्थात्मक विकासाला कसे उद्ध्वस्त केले आहे, हे दिसत असल्याचे जयराम रमेश यांनी नमूद केले आहे.

हेही वाचा – Gautam Adani : अदानी पुन्हा फसले, अमेरिकेने भ्रष्टाचार आणि लाचखोरीसारखे गंभीर आरोप लावले

सेबीवर निशाणा

अमेरिकेतील या घडामोडींमुळे अदानी समूहाद्वारे सिक्युरिटीज आणि इतर कायद्यांच्या उल्लंघनाची चौकशी करणाऱ्या सेबीचे (SEBI) अपयश पुन्हा एकदा उघड झाले आहे. अदानी समूहचे गुंतवणुकीचे स्रोत, शेल कंपन्या आदी सेबीने समोर आणलेले नाही. परिणामी अदानी महाघोटाळ्यातील सिक्युरिटीज कायद्याच्या उल्लंघनाचा तपास पूर्ण करण्यासाठी नवीन आणि विश्वासार्ह सेबीप्रमुखाची नियुक्ती करणे तसेच अदानी प्रकरणाची पूर्ण चौकशी करण्यासाठी त्वरित जेपीसी स्थापन करणे हाच योग्य मार्ग आहे, असे त्यांनी म्हटले आहे. (US Bribery Case: Congress again demands immediate formation of JPC in Adani case)

हेही वाचा – Sanjay Raut : शिंदे, फडणवीसांना हाताशी धरून अदानींचा भ्रष्टाचार, राऊतांचा आरोप


Edited by Manoj S. Joshi

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -