अमेरिका-चीनमधील वाद पेटला, अॅप्पलने घेतला मोठा निर्णय

चीनी सरकार-अनुदानित YMTC चिप्स वापरण्यासाठी अॅप्पलने वर्षभरापुरतीच योजना आखली होती. कारण इतर कंपनीपेक्षा ही कंपनी किमान 20% स्वस्त आहेत. परंतु अमेरिका आणि चीन यांच्यातील वाढत्या राजकीय दबावामुळे अॅपलला हा निर्णय घेणे भाग पडले.

iphone

नवी दिल्ली – प्रसिद्ध टेक कंपनी अॅप्पलने चीनला मोठा धक्का दिला आहे. अॅप्पलच्या उत्पादनांसाठी चिनी वस्तू वापरण्यात येणार नसल्याचं अॅप्पलने जाहीर केलं आहे. अमेरिकेत चिनी वस्तूंच्या निर्यातीवर बंदी घातली जात असतानाच अॅप्पलने हा मोठा निर्णय घेतला आहे.

अॅप्पलने आयफोनसाठी यांग्त्जी मेमरी टेक्नॉलॉजी कंपनीकडून १२८ लेअर 3D NAND फ्लॅश मेमरीला प्रमाणित करण्याकरता महिन्याभरापूर्वीच प्रक्रिया पूर्ण केली होती. मात्र, त्यांच्या चिपचा वापर करण्यास अॅप्पलने आता बंदी घातली आहे. NAND फ्लॅश मेमरी आपल्या सर्व स्मार्टफोन, संगणकसह सर्व सर्व्हरमध्ये वापरण्यात येणारं महत्त्वाचं उपकरण आहे. तर, YMTC’S 128-लेयर चिप्स ही अॅडवान्स चीप आहे जी चिनच्या कंपनीकडून बनवली जाते.

चीनी सरकार-अनुदानित YMTC चिप्स वापरण्यासाठी अॅप्पलने वर्षभरापुरतीच योजना आखली होती. कारण इतर कंपनीपेक्षा ही कंपनी किमान 20% स्वस्त आहेत. परंतु अमेरिका आणि चीन यांच्यातील वाढत्या राजकीय दबावामुळे अॅपलला हा निर्णय घेणे भाग पडले.

वॉशिंग्टनने 7 ऑक्टोबर रोजी YMTC ला नोंदणीकृत नसलेल्या कंपनीच्या यादीत ठेवले. YMTC चिप्स सुरुवातीला फक्त चिनी बाजारात विकल्या जाणार्‍या आयफोनसाठी वापरण्यात येत होते. मात्र, आता Apple सर्व iPhones साठी आवश्यक असलेल्या NAND फ्लॅश मेमरीपैकी 40% पर्यंत YMTC कडून खरेदी करण्याचा विचार करत होती.