Maharashtra Assembly Election 2024
घरदेश-विदेशUS company : कंपनीने एका झटक्यात 99 कर्मचाऱ्यांना काढून टाकले, सोशल मीडियावर...

US company : कंपनीने एका झटक्यात 99 कर्मचाऱ्यांना काढून टाकले, सोशल मीडियावर रंगली चर्चा

Subscribe

आपल्यामध्ये झालेले सर्व करार मी रद्द करत आहे. कृपया तुमच्याकडे कंपनीची जी काही सामग्री असेल ती परत करा. तसेच, कंपनीशी संबंधित सर्व अकाऊंट्समधून साइन आउट व्हा आणि कंपनीत सहभागी असल्याचे समजू नका. सभेला उपस्थित न राहून तुम्ही मनमानी कारभार केला असल्याचे ते म्हणाले.

(US company) वॉशिंग्टन : अमेरिकेतील एका कंपनीने एका झटक्यात 99 कर्मचाऱ्यांना काढून टाकल्याचे समोर आले आहे. यामुळे कंपनीत आता केवळ 12 कर्मचारी राहिले आहेत. याचे या कंपनीतील प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्याने सोशल मीडियावर याचे कारण देताच, नेटकऱ्यांमध्ये याबाबत चर्चा रंगली आहे. अनेकांनी या कारवाईवर संताप व्यक्त केला आहे.
अमेरिकास्थित कंपनीच्या सीईओने ही कारवाई केली. प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू झाल्यानंतर काही तासांतच कामावरून काढून टाकण्यात आल्याचा मेसेज मिळाला, असे एका प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्याने याबाबतची पोस्ट सोशल मीडियावर शेअर करताना म्हटले आहे. (Fired 99 employees who did not attend a meeting called by the CEO)

वाद्याशी संबंधीत कंपनीत एकूण 111 कर्मचारी होते. सीईओने बोलावलेल्या मिटिंगला अनेकांनी पाठ फिरवली. यामुळे संतापलेल्या सीईओने त्यापैकी 99 जणांना काढून टाकले. आपल्या कामाबद्दल गंभीर नाहीत, अशांना कामावरून काढून टाकण्यात येत असल्याचे त्याने आपल्या आदेशात म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – SS UBT Vs BJP : मणिपुरात हिंसेचा आगडोंब अन् मोदी-शहा प्रचारात दंग, ठाकरे गटाचे टीकास्त्र

तुमच्यापैकी जे मिटिंगला आले नाहीत, त्यांनी ही अधिकृत नोटीस समजावी. तुम्हा सर्वांना तुमच्या नोकरीतून काढून टाकण्यात आले आहे. मिटिंगमध्ये सहभागी न होऊन तुम्ही मनमानी केली आहे. आपल्या वरिष्ठांच्या मेसेजकडे तुम्ही दुर्लक्ष केले. ज्याप्रकारे करार करण्यात आला होता, त्यानुसार कृती करण्यात तुम्ही अपयशी ठरला आहात. तुम्ही त्यातील अटी पूर्ण करू शकला नाहीत. मिटिंग बोलावल्यानंतर तुम्ही त्याला उपस्थित राहायला पाहिजे होते, असे सीईओने कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या मेसेजमध्ये म्हटले आहे.

- Advertisement -

आपल्यामध्ये झालेले सर्व करार मी रद्द करत आहे. कृपया तुमच्याकडे कंपनीची जी काही सामग्री असेल ती परत करा. तसेच, कंपनीशी संबंधित सर्व अकाऊंट्समधून साइन आउट व्हा आणि कंपनीत सहभागी असल्याचे समजू नका. सभेला उपस्थित न राहून तुम्ही मनमानी कारभार केला असल्याचे ते म्हणाले.

या घटनेवरून सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. मीटिंगला न आल्याने नोकरीवरून काढून टाकणे योग्य नाही. एवढ्या मोठ्या संख्येने कर्मचारी मिटिंगला का आले नाहीत, याचे कारणही स्पष्ट झाले पाहिजे. जर कर्मचारी काही कारणास्तव नाराज असतील तर, त्यादृष्टीनेही विचार करायला पाहिजे, असा सूर बहुतांश नोटिझन्सचा आहे. (US company: Fired 99 employees who did not attend a meeting called by the CEO)

हेही वाचा – Uddhav Thackeray : केलंय काम भारी, लुटली तिजोरी, केली गद्दारी; कर्जतमध्ये भर उन्हात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली


Edited by Manoj S. Joshi

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -