घरताज्या घडामोडीWhite House बाहेर गोळीबार, डोनाल्ड ट्रम्प सुरक्षित!

White House बाहेर गोळीबार, डोनाल्ड ट्रम्प सुरक्षित!

Subscribe

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पत्रकार परिषद सुरू असताना व्हाईट हाऊसबाहेर गोळीबार झाला. सध्या स्थिती नियंत्रणात असून डोनाल्ड ट्रम्प सुरक्षित असल्याच समजत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी या संदर्भात माहिती दिली. या स्थितीवर तातडीने नियंत्रण मिळवण्यात आलं आहे. यासाठी मी गुप्तहेरांचे आभार मानतो असंही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

या गोळीबारादरम्यान तिथल्या सुरक्षा यंत्रणांनी चोख प्रत्युत्तर दिलं. यावेळी आरोपीला गोळी लागली आहे, सध्या तो जखमी आहे. आरोपीला रूग्णालयात दाखल करण्यात आलं असून पुढील तपास सुरू आहे. या गोळीबारात एक अधिकरीही सहभागी असल्याची माहिती मिळाली आहे

- Advertisement -

कोरोना रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेत ६५ मिलियन लोकांची चाचणी करण्यात आली आहे. एवढ्या मोठ्या संख्येनं कोरोनाची चाचणी करणारा अमेरिका जगातला पहिला देश आहे. तर दुसऱ्या स्थानावर भारताचा क्रमांक लागतो. कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी जी लस लगणार आहे ती या वर्षाच्या अखेरपर्यंत बाजारात उपलब्ध होऊ शकेल असा ट्रम्प यांनी विश्वास व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -