घरदेश-विदेशWe did it Joe! बायडेन यांना फोन करताच कमला हॅरिस यांच्या डोळ्यात...

We did it Joe! बायडेन यांना फोन करताच कमला हॅरिस यांच्या डोळ्यात आनंदाश्रू!

Subscribe

अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प यांचा पराभव केल्यानंतर डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष होणार आहेत. जो बायडेन हे अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतील. तर त्यांच्या पक्षाच्या कमला हॅरिस यांनीदेखील उपराष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकून इतिहास रचला आहे. कमला हॅरिस या अमेरिकेच्या पहिल्या उपराष्ट्राध्यक्ष बनल्या आहेत.

दरम्यान, काल निकाल लागताच कमला हॅरिस यांनी जो बायडेन यांना फोन करत आपण जिंकलो असल्याचे सांगितले. यावेळी त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहू लागले. या क्षणाचा व्हिडीओ कमला हॅरिस यांनी शेअर केला आहे. कमला हॅरिस यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कमला हॅरिस यांनी “We did it Joe! तुम्ही अमेरिकेचे पुढील राष्ट्राध्यक्ष होणार आहात” असे जो बायडन यांना म्हटले आहे.

- Advertisement -

या विजयानंतर कमला हॅरिस अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष होणार असून, अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदा महिला उपराष्ट्राध्यक्ष होणार आहेत. तर, भारतीय वंशाची व्यक्ती अमेरिकेतील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहचण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्याचबरोबर त्या पहिल्या कृष्णवर्णीय आफ्रिकी-अमेरिकी उपाध्यक्ष होत आहेत.

निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर कमला हॅरिस यांनी त्यांच्या आईची आठवण काढली. “माझी आई श्यामला गोपालन जेव्हा १९ वर्षांची होती, तेव्हा ती भारतातून इथे आली होती. तेव्हा कदाचित तिने देखील या क्षणाची कल्पनाही केली नसावी. मात्र ती अमेरिकेवर एवढा विश्वास करत होती की, जिथे असा क्षण शक्य आहे,” असे कमला हॅरिस म्हणाल्या.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -