घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटडोनाल्ड ट्रम्प भारतावरच उलटले! अमेरिकेत प्रचारासाठी केला भारतावर गंभीर आरोप!

डोनाल्ड ट्रम्प भारतावरच उलटले! अमेरिकेत प्रचारासाठी केला भारतावर गंभीर आरोप!

Subscribe

जगभरात जरी कोरोनाचा कहर सुरू असला, तरी अमेरिकेत मात्र सध्या निवडणुकांचा ज्वर पाहायला मिळत आहे. अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे प्रतिस्पर्धी जो बायडेन यांच्यात या प्रचारादरम्यानचं पहिलं डिबेट सुरू आहेत. यादरम्यान दोन्ही नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारतावर गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे कोरोनाचं संकट सुरू होण्यापूर्वी भारतात येऊन मैत्रीचे आणि अभिमान वाटत असल्याचे गोडवे गाणारे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेतल्या निवडणुकांमध्ये प्रचारासाठी भारतावर टीका करत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे ट्रम्प यांचं भारतप्रेम किती बेगडी आहे, हेच यावरून दिसत असल्याचं आंतरराष्ट्रीय संबंधांच्या जाणकारांचं म्हणणं आहे.

काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?

प्रचारादरम्यान अमेरिकेतील कोरोनाच्या परिस्थितीवरून जो बायडेन ट्रम्प यांच्यावर टीका करत होते. ‘अमेरिकेतल्या कोरोनाच्या परिस्थितीवर डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे काहीही उत्तर नाही. पैसा नाही. त्यामुळे ट्रम्प हे अमेरिकेच्या इतिहासातले आत्तापर्यंतचे सर्वात वाईट राष्ट्राधअयक्ष आहेत. ते मास्क वापरत नव्हते. ईस्टरपर्यंत कोरोना संपेल असा दावा करत होते. जर आत्ताच पावलं उचलली नाहीत, तर लाखो लोकं मारली जातील’, अशी टीका बायडेन यांनी केली. त्यावर बोलताना ट्रम्प म्हणाले, ‘जगभरात कोरोना पसरण्यासाठी चीनच जबाबदार आहे. चीन, रशिया आणि भारत या तीनही देशांनी कोरोनाच्या रुग्णांची संख्या लपवली आहे. त्यामुळे कोरोना वाढायला हातभारच लागला आहे’, असा दावा ट्रम्प यांनी यावेळी केला.

- Advertisement -

याआधीही ट्रम्प यांनी भारतावर कोरोनासंदर्भात टीका केली होती. ‘भारत, चीन, रशिया त्यांच्या हवेची काळजी घेत नाहीत. पण अमेरिका घेते’, असं ट्रम्प म्हणाले होते. अमेरिकेत हायड्रॉक्सिक्लोरोक्विनची मागणी वाढलेली असताना भारताने ते पुरवण्यासाठी मदतीचा हात पुढे केला होता. मात्र, त्याच्या परतफेडीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र उलट भारतावरच गंभीर आरोप केले आहेत.


वाचा सविस्तर – डोनाल्ड ट्रम्पनी काढलं भारताचं खुसपट; म्हणे, ‘भारत काळजी घेत नाही’!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -