घरदेश-विदेशट्रम्प यांच्याकडून खोट्या आरोपांचा भडिमार; वाहिन्यांनी मध्येच लाईव्ह कव्हरेज थांबवलं

ट्रम्प यांच्याकडून खोट्या आरोपांचा भडिमार; वाहिन्यांनी मध्येच लाईव्ह कव्हरेज थांबवलं

Subscribe

जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेला जो बायडेन यांच्या रुपात नवा राष्ट्राध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रध्यक्ष निवडणुकीची मतमोजणी सुरु असून सध्या बायडेन विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. दरम्यान, पराभवाची चाहूल लागताच विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार जो बायडेन आणि डेमोक्रॅटिक पक्षावर जोरदार हल्ला चढवला आहे. डेमोक्रॅटिक पक्षाने निवडणूक प्रक्रियेत घोटाळा केल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे. पत्रकार परिषद घेत ट्रम्प यांनी स्वत:च्या विजयाची घोषणा केली. यावेळी त्यांनी अनेक आरोप केले जे निरर्थक आहेत असे म्हणत अनेक वृत्तवाहिन्यांनी मध्येच त्यांच्या भाषणाचे प्रसारण थांबवले.

डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी गुरुवारी व्हाइट हाऊसमध्ये पत्रकार परिषद घेतली. ट्रम्प यांनी १७ मिनिटाच्या पत्रकार परिषदेत अनेक प्रक्षोभक आणि चुकीचे दावे केले. डेमोक्रॅटिक पक्ष बेकायदा मतांच्या आधारे आमच्या हातातून विजय चोरण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप ट्रम्प यांनी केला आहे. ट्रम्प चूकीची माहिती आणि खोटे दावे करत असल्याचे म्हणत एनबीसी आणि एबीसी वृत्तवाहिन्यांनी तात्काळ लाईव्ह कव्हरेज थांबवले. याबाबतचे वृत्त एएफपीने दिले आहे. “अमेरिकेसाठी ही वाईट रात्र असून त्यांचे राष्ट्राध्यक्षच लोकांवर निवडणुकीत विजय चोरण्याचा प्रयत्न होतोय असा चुकीचा आरोप करताहेत,” असे सीएनएनच्या अँकरने म्हटले. कुठलाही पुरावा नसताना खोटे आरोप केले जात आहेत असे सीएनएनच्या अँकरने म्हटले.

- Advertisement -

डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन हे विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. तर विद्यमान राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पिछाडीवर आहेत. गुरुवारपासून बायडेन २६४ मतांसोबत आघाडीवर असून त्यांना विजयासाठी केवळ ६ मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे बायडेन यांचा विजय नक्की मानला जात आहे. तर दुसरीकडे ट्रम्प यांना २१४ इलेक्टोरल मते मिळाली आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -