घरताज्या घडामोडीकोण जिंकणार ट्रम्प की बायडेन? अमेरिकेच्या भावी राष्ट्राध्यक्षावर १ अरब डॉलरचा सट्टा...

कोण जिंकणार ट्रम्प की बायडेन? अमेरिकेच्या भावी राष्ट्राध्यक्षावर १ अरब डॉलरचा सट्टा लागलाय

Subscribe

जगातील लोकशाहीप्रधान देशांमध्ये भारतानंतर अमेरिका हा सर्वात मोठा देश आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीवर संपुर्ण जगाचे लक्ष आहे. सध्या खेळांपासून ते निवडणुकीपर्यंत सर्वच गोष्टींवर सट्टाबाजार तेजीत असतो. तसा अमेरिकेच्या निवडणुकीवर देखील सट्टाबाजार लागला आहे. एका रिपोर्टनुसार राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीवर १ अरब डॉलरचा (अंदाजे ७४५० कोटी) इतका सट्टा लागला आहे. २०१६ च्या निवडणुकींपेक्षा सध्याचा सट्टा दुप्पट असल्याचे सांगण्यात येत आहे. डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बिडन यांच्यावर सर्वाधिक सट्टा लागला आहे. बिडन सध्या सट्टेबाजांचे लाडके नेते ठरले आहेत. अनेक सट्टेबाजांच्या मतानुसार बायडेन निवडणूक जिंकतील, असे सांगण्यात येत आहे.

आज होत आहे निवडणूक

ट्रम्प आणि बायडेन यांच्यात होणारी निवडणूक चुरशीची होत आहे. आज (३ नोव्हेंबर) अमेरिकेत शेवटच्या टप्प्यातले मतदान पार पडत आहे. रिपब्लिकन पक्षातर्फे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पुन्हा मैदानात उतरले आहेत. तर डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन त्यांना कडवी झुंज देत आहेत. मात्र सट्टेबाज हे बायडेन यांच्याबाजूने कौल देत असून त्यांच्याबाजूने सर्वाधिक बोली लागली आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या रिपोर्टनुसार हा जगातील सर्वात मोठा सट्टा असू शकतो.

- Advertisement -

आतापर्यंत सर्वाधिक सट्टा हा फुटबॉल सामन्यांसाठी लागत आलेला आहे. मात्र यावेळी अमेरिकेच्या निवडणुकीने सट्टा बाजाराचे सर्व विक्रम मोडले आहेत. डार्क वेबवर अनेक वेबसाईट आहेत, ज्या या निवडणुकीवर सट्टा लावत आहेत. फक्त अमेरिकाच नाही तर ब्रिटन, न्यूझीलँड, कॅनडा या देशातील अनेक वेबसाईट देखील अमेरिकेच्या निवडणुकीवर सट्टा लावत आहेत.

Reuters या न्यूज वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार न्युझीलँडची वेबसाईट PredictIt ने बायडेन यांच्यावर ६८ सेंट तर ट्रम्प यांच्यावर ३९ सेंटचा सट्टा लावला आहे. ब्रिटनची कंपनी Betfair एक्सचेंजवर देखील बायडेन यांच्या विजयाबद्दल ६५ टक्के खात्री तर ट्रम्प यांच्या विजयावर ३५ टक्के खात्री व्यक्त केली आहे. BC Bettors नावाच्या वेबसाईटवर ४४ टक्के लोक ट्रम्प पुन्हा राष्ट्राध्यक्ष होतील, असे सांगत आहेत. तर २७ टक्के लोक बायडेन हे विजयी होतील, असा दावा करत आहेत.

- Advertisement -

दरम्यान अमेरिकेतील सट्टाबाजाराचे संकेत हे मजबूत असल्याचे सांगितले जाते. मागच्या ५० वर्षांच्या इतिहासात सट्टेबाजांनी विजयी घोषित केलेल्या चार पैकी तीन उमेदवारांचा विजय झालेला आहे. म्हणजे सट्टाबाजाराचे भाकीत ७५ टक्के प्रकरणात सत्य ठरले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -