अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या घरावर FBIचे छापे, महत्त्वाची कागदपत्रं केली जप्त

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो. बायडेन यांच्या घरावर अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने (FBI) छापेमारी केली आहे. जो. बायडेन यांच्या विल्मिंग्टन येथील निवासस्थानी १३ तास एफबीआयच्या अधिकाऱ्यांनी झडती घेतली. अध्यक्षांचे वकील बॉब बाउर यांनी ही माहिती दिली.

Chinese social media abuzz with Joe Biden's election triumph

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो. बायडेन यांच्या घरावर अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने (FBI) छापेमारी केली आहे. जो. बायडेन यांच्या विल्मिंग्टन येथील निवासस्थानी १३ तास एफबीआयच्या अधिकाऱ्यांनी झडती घेतली. अध्यक्षांचे वकील बॉब बाउर यांनी ही माहिती दिली. बायडेन हे पुन्हा निवडणुकीसाठी आपला दावा करण्याच्या तयारीत असताना एफबीआयने केलेली झडती बायडेन यांच्यासाठी अडचणीची ठरली आहे. (US FBI searched President Joe Biden home found six more classified documents)

अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने (FBI) या ठिकाणाहून काही गोपनीय दस्तऐवज जप्त केले आहेत. एफबीआयने बायडेन यांच्या काही हस्तलिखित नोट्सही ताब्यात घेतल्या आहेत. बायडेन यांनी स्वेच्छेने एफबीआयला निवासस्थानी झडती घेण्याची परवानगी दिली. मात्र, वॉरंट नसतानाही घडलेली ही घटना असामान्य आहे.

जो. बायडेन यांच्या विल्मिंग्टन येथील निवासस्थानात आणि खासगी कार्यालयांमध्ये सापडलेल्या एकूण गोपनीय कागदपत्रांची संख्या आता सुमारे दीड डझनवर गेली आहे. ही सर्व कागदपत्रे २००९ ते २०१६ या काळात त्यांच्या उपाध्यक्षपदाच्या कार्यकाळाशी संबंधित असून ही कागदपत्रे फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन यांच्या ताब्यात आहेत. दरम्यान, बायडेन यांनी १९७३ ते २००९ या काळात सिनेटर म्हणून काम केले आहे.

याबाबत झडतीनंतर जो बायडेन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आम्हाला अनेक कागदपत्रे चुकीच्या ठिकाणी सापडली आहेत. आम्ही त्यांना तात्काळ न्याय विभागाकडे सुपूर्द केले आहे. आम्ही या प्रकरणात पूर्ण सहकार्य करत आहोत आणि लवकरच यातून बाहेर पडू”, असे बायडेन म्हणाले. घराची झडती घेतली तेव्हा राष्ट्राध्यक्ष बायडेन आणि त्यांची पत्नी घरी नव्हते. या कारवाईनंतर एफबीआय कोणते पाऊल उचलणार हे अद्याप समोर आलेले नाही.


हेही वाचा – Video : ‘तो’ व्हिडीओ शेअर करत उद्योगपती आनंद महिंद्रांचा नागरिकांना सावधानतेचा इशारा