घरअर्थजगतआर्थिक मंदीचे सावट? US फेडरल बँकेकडून पुन्हा व्याजदरात वाढ

आर्थिक मंदीचे सावट? US फेडरल बँकेकडून पुन्हा व्याजदरात वाढ

Subscribe

जगभरातील अनेक देशात आर्थिक मंदी आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे असतानाच यूएस फेडरल रिझर्व्ह बँकेने महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे.

जगभरातील अनेक देशात आर्थिक मंदी आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे असतानाच यूएस फेडरल रिझर्व्ह बँकेने महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. US फेडरलची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याजदर वाढवण्याबाबत निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा अमेरिकेच्या चलनावर आणि आंतरराष्ट्रीय स्टॉक मार्केटवर मोठा परिणाम देखील दिसून आला. (us federal reserve bank raises interest rates 25 basis points)

फेडरल रिझर्व्ह बँकेने बुधवारी आपल्या प्रमुख व्याजदरात एक चतुर्थांश अंकांनी वाढ केली. फेडरल रिझर्व्हने मार्चपासून केलेली ही आठवी वाढ आहे. फेडरल रिझर्व्हच्या या निर्णयानंतर आता व्याजदर 4.50 वरून 4.75 अंकांवर गेले आहेत. पुढच्या काळातही दरवाढ होण्याची शक्यता असल्याचे संकेत यूएस फेडरलने दिले आहेत. फेडच्या या निर्णयामुळे अनेक ग्राहक आणि व्यावसायिक कर्जांचा खर्च वाढेल. तसेच, फेडने घेतलेल्या निर्णयामुळे मंदीचा धोका वाढण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

फेडच्या या निर्णयाचा सर्वात मोठा परिणाम पेट्रोल-डिझेल आणि ज्या वस्तू भारतात आयात केल्या जातात त्यावर होणार आहे. भारताताला क्रूड ऑइल आयात करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागू शकतात. त्याच बरोबर इतर वस्तूंसाठी देखील जास्त पैसे मोजावे लागू शकतात.

फेडरल रिझर्व्ह बँकेच्या 2 दिवसांच्या बैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले की, महागाई काही प्रमाणात कमी झाली असली तरी ती अजूनही उच्च पातळीवर आहे. 15 डिसेंबरलाच फेडरल रिझर्व्हने व्याजदरात 0.50 बेसिस पॉईंटने वाढ केली होती. या वर्षाच्या अखेरीस व्याजदरात 0.75 टक्के वाढ अपेक्षित आहे.

- Advertisement -

आयएमएफच्या वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलूकनुसार, जागतिक वृद्धीदर 2022मध्ये वर्तवलेल्या अंदाजे 3.4 टक्क्यांवरून 2023मध्ये 2.9 टक्क्यांपर्यंत घसरण्याचा शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानंतर 2024मध्ये तो वाढून 3.1 टक्क्यांपर्यंत जाईल. 2023 मध्ये अमेरिकेचा (USA) विकास दर 1.4 टक्के असण्याची शक्यता आहे, तर ब्रिटनची (UK) अर्थव्यवस्था उणे 0.6 टक्का राहण्याचा अंदाज आहे. अशा परिस्थितीत भारताची आर्थिक स्थिती चांगली असल्याचे मोदी सरकराने सांगितले आहे.


हेही वाचा –अखेर अदानी समूहाचा एफपीओ रद्द; गुंतवणूकदारांना पैसे परत मिळणार

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -