घरCORONA UPDATEफायझर लस निर्मात्यासह पत्नीलाही चक्क कोरोनाची लागण, 4 डोस घेऊनही संसर्ग

फायझर लस निर्मात्यासह पत्नीलाही चक्क कोरोनाची लागण, 4 डोस घेऊनही संसर्ग

Subscribe

यात आता सीईओ अल्बर्ट बोर्ला यांनी सोमवारी सांगितले की, त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे दिसून येत आहे

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या पत्नी फर्स्ट लेडी जिल बायडेन कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले होते, यात आता फायझर या कोरोना लस उत्पादक कंपनीचे सीईओ अल्बर्ट बोर्ला यांच्यासह त्यांच्या पत्नीलाही कोरोना लागण झाली आहे. मात्र त्यांना सौम्य लक्षणे आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. मंगळवारी त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. तर सोमवारी जिल बायडेन यांचीही चाचणी निगेटिव्ह आली. यानंतर सायंकाळी त्यांना सर्दीसारखी सौम्य लक्षणे दिसून लागली. त्यांचा अँटिजेन चाचणी अहवाल निगेटिव्ह आला होता, मात्र पीसीआर चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

- Advertisement -

यात आता सीईओ अल्बर्ट बोर्ला यांनी सोमवारी सांगितले की, त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे दिसून येत आहेत. बोर्ला यांनी एक निवेदन जारी करत म्हटले की, मला जनतेला सांगायचे आहे की, माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे मी आयसोलेशनमध्ये असून आवश्यक ती पावले उचलत आहे.

अल्बर्ट बोर्ला यांनी पुढे म्हटले की, मी आभार मानू इच्छिते फायझर बायोएनटेक वॅक्सिनचे चार डोस घेतल्याने मला आता कमी लक्षणं दिसून येत आहेत. मला आता बरं वाटतं आहे. मी आता Paxlovid घेणे सुरु केले आहे. अमेरिकन FDA ने Paxlovid लसीच्या डिसेंबर 2021 मध्ये आतापतकालीन वापरास मंजुरी देण्यात आली. paxlovid ही लस कोरोनाचे सौम्य आणि मध्यम लक्षणं असलेल्या रुग्णांना दिली जाते. या लसीचा उपयोग 12 वर्षावरील लोकांसाठी केला जातो. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीही कोरोनाची लागण झाली त्यावेळी त्यांवर या लसीचा वापर करण्यात आला होता.

- Advertisement -

जो बायडेन आता 79 वर्षांचे आहेत. कोरोना संसर्गानंतर त्यांना नाकातून पाणी येणे, थकवा, कोरडा खोकला यांसारखी लक्षणे दिसून येत होती. राष्ट्रपती जो बायडेन यांनी अँटीव्हायरल पॅक्सलोव्हिड ट्रिटमेंट देण्यात आली. जो बायडेन यांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले आहेत.


सुकेश चंद्रशेखर प्रकरणात अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसवर 215 कोटींचे आरोपपत्र दाखल


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -