ऑस्ट्रेलियातील वणव्यासाठी विकले न्यूड फोटो; २ दिवसांत कमावले ५ कोटी

US girl sells her nude photos to raise $700k for Australia fires. Instagram deactivates her account
ऑस्ट्रेलियातील वनव्यासाठी विकले न्यूड फोटो; २ दिवसात कमावले ५ करोड

ऑस्ट्रेलियामध्ये भीषण आग वणव्यातील लोकांना मदत करण्यासाठी अमेरिकेतील सोशल मीडिया इनफ्लुएंसरने एका अनोख्या पद्धतीची मोहीम सुरू केली आहे. कालयन वार्ड असं तिचं नाव असून ती तिचे न्यूड फोटो विकत आहे. तिने दोन दिवसांत न्यूड फोटो विकून तब्बल ५ कोटी रुपये एवढी रक्कम जमा केली आहे. २० वर्षांच्या कायलनच्या ट्विटर अकाऊंटचं नावं ‘न्यूड द फिलीनथ्रोपिस्ट’ असं आहे. जे १० डॉलर्स देतील अशा लोकांना ती न्यूड फोटो पाठवते आणि ते पैसे ती ऑस्ट्रेलियामध्ये लागल्या वणव्यातील नुकसानासाठी देणार आहे, असं तिनं ४ जानेवारीला ट्विटर अकाऊंटवरून घोषित केलं.

तिनं ट्विटमध्ये असं लिहिलं की, ‘ऑस्ट्रेलियात लागलेल्या वणव्यासाठी जे कोणी १० डॉलर्सची मदत करेल त्या प्रत्येक व्यक्तीला मी न्यूड फोटो पाठवेल. प्रत्येकी १० डॉलर्स मागे माझ्याकडून तुम्हाला एक न्यूड फोटो मिळेल. तुम्ही मदत केली आहे याची मला खात्री होण्यासाठी तुम्ही पुरावे पाठवायलाच पाहिजे.’

तिच्या या अनोख्या मोहिमेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. तिनं फक्त दोन दिवसांत तब्बल ५ कोटी म्हणजेच ७ लाख डॉलर्स जास्त रक्कम जमा केली. याविषयी तिनं ६ जानेवारीला एका ट्विटद्वारे माहिती शेअर केली आहे. तिनं असं लिहिलं की, ‘ऑस्ट्रेलियातील वणव्यासाठी माझ्या ट्विटला चांगला प्रतिसाद येऊन तब्बल ७ लाख डॉलर्सपेक्षा अधिक रक्कम वाढलेली आहे. हे खरं आयुष्य आहे का?’

या अनोख्या मोहीमेनंतर इन्स्टाग्रामने कायलनचे अकाऊंट बंद केलं आहे. त्यानंतर अजून एक इन्स्टाग्राम अकाऊंट सुरू केल्यानंत ते देखील कंपनीने बंद केले.

ती हे पैस स्वतःच्या खिशात घालतं असल्याचे आरोप कायलनवर करण्यात आले होते. त्यानंतर ट्विटरवरून या आरोपाला फेटाळून लावलं.

ऑस्ट्रेलियाच्या या भीषण वणव्यामध्ये जवळपास ५ दशलक्ष हेक्टर जमीन जळून खाक झाली आहे. तसंच ५० कोटी पेक्षा जास्त पक्षी आणि प्राणी मरण पावले आहेत.


हेही वाचा – Video: पिझ्झाच्या ओव्हनमध्ये शिजून निघाला साप!