Sunday, March 16, 2025
27 C
Mumbai
Homeदेश-विदेशIndians In America : 487 भारतीयांना परत पाठवणार अमेरिका, 295 लोकांची पाठवली नावे

Indians In America : 487 भारतीयांना परत पाठवणार अमेरिका, 295 लोकांची पाठवली नावे

Subscribe

Indians Deportation : नवी दिल्ली : अमेरिकेने 295 लोकांची एक यादी भारताला पाठवली आहे. या लोकांच्या नागरिकतेबद्दल संभ्रम आहे. त्याची खात्री झाली की, त्यांना भारतात परत पाठवले जाईल. अमेरिकेतून पुन्हा भारतात पाठवण्यात येणाऱ्या 487 लोकांच्या दुसऱ्या तुकडीमध्ये यांचा समावेश आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी शुक्रवारी एका पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. (us given 295 names to verify if they are indians are part of 487 people who the us wants to remove)

बेकायदेशीररित्या अमेरिकेत स्थलांतर करण्यात आलेल्या भारतीयांना पुन्हा एकदा भारतात परत पाठवण्यात येत आहे. अशा 104 भारतीयांची एक तुकडी नुकतीच भारतात परत आली आहे. त्यावरून विरोधक केंद्र सरकारवर टीका करत आहेत. अशातच आता परराष्ट्र सचिवांची पत्रकार परिषद झाली. त्यांनी अमेरिकेतून भारतात पाठवण्यात येणाऱ्या 487 नागरिकांना चिन्हित केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच 295 लोकांची माहिती भारताला पाठवण्यात आली आहे. अमेरिकेने पाठवलेल्या माहितीची सत्यता पडताळण्यात येत आहे.

हेही वाचा – Rahul Gandhi : लेखी उत्तर देऊ, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील गोंधळाच्या आरोपावरून आयोगाचे राहुल गांधींना उत्तर

अशाप्रकारे बेकायदेशीररित्या दुसऱ्या देशात राहणाऱ्या नागरिकांना परत पाठवणे ही नेहमीची प्रक्रिया आहे, ज्याबाबत परराष्ट्र मंत्र्यांनी काल संसदेत सांगितले होते. ज्यांना परत पाठवायचे असेल, त्यांचे नागरिकत्व त्याच देशाचे आहे की नाही, हे पडताळून पाहणे यात काहीच चुकीचे नाही. कारण, यात कायदा आणि सुव्यवस्थेचे अनेक प्रश्न असतात.

अमेरिकेने 487 संभाव्य भारतीयांना परत पाठवले जाईल, असे सांगितले होते. भारत सरकारने यासंदर्भात आणखी माहिती मागवली होती. त्यामुळेच 298 लोकांची सविस्तर माहिती अमेरिकेने भारताला दिली आहे. भारत या सगळ्या घटनांवर लक्ष ठेवून आहे आणि अमेरिकेच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत.

ज्या पद्धतीने 104 भारतीयांची पहिली तुकडी परत पाठवण्यात आली आहे, त्यावरून भारताने अमेरिकेकडे नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, अशा प्रकारची वागणूक देण्याची काहीही आवश्यकता नव्हती, असे परराष्ट्र सचिव मिस्त्री यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – Akshay Shinde Encounter Case : कुटुंबीयांची माघार, पण सुनावणी सुरूच ठेवण्याची न्यायालयाची भूमिका