Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Coronavirus: १२ वर्ष आणि त्यापेक्षा अधिक वय असलेल्यांचा मृत्यूचा धोका होणार कमी:...

Coronavirus: १२ वर्ष आणि त्यापेक्षा अधिक वय असलेल्यांचा मृत्यूचा धोका होणार कमी: Pfizerच्या Paxlovid गोळीला मंजूरी

Subscribe

सध्या जगभरात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनची दहशत पसरली आहे. या व्हेरिएंटपासून बचाव करण्यासाठी प्रत्येक देश पुन्हा एकदा निर्बंध लावत आहेत. अमेरिकेत ओमिक्रॉनने भयानक रुप धारण केले असून १ ओमिक्रॉनबाधिताचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोना आणि ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने यूएस एफडीएने बुधवारी फायझरची पॅक्सलोविड गोळीला मंजूरी दिली. आता अमेरिकेत १२ वर्ष आणि त्याहून अधिक वय असलेल्या लोकांच्या कोरोना उपचारामध्ये पॅक्सलोविड टॅबलेटचा वापर होणार आहे. दरम्यान भारतात फायझरची ही गोळी उपलब्ध होण्यासाठी बराच काळ आहे.

ही पहिली अशी गोळी आहे, ज्यामुळे नवीन बाधित रुग्ण आता रुग्णालयापासून बाहेर राहण्यासाठी घरी घेऊन जाऊ शकतात. हे रुग्ण कोरोनाविरोधातील लढाईमध्ये पॅक्सलोविड टॅबलेटचा वापर करू शकतात. महामारीच्या काळात ही गोळी कोरोनाप्रतिबंधात्मक लसीप्रमाणे एक महत्त्वाचे अस्त्र आहे. जी लाखो लोकांच्या उपचारात मदत करेल. अमेरिकेने पॅक्सलोविड टॅबलेट तयार करून कोरोनाशी झुंज देत असलेल्या लोकांमध्ये मृत्यूचा धोका कमी होण्याचा दावा केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Omicron Variant: ओमिक्रॉमसह गंभीर आजारांपासून बचाव करेल Pfizer ची गोळी!

एफडीए वैज्ञानिक पॅट्रिजिय कॅवाजोनी म्हणाले की, ‘जगभरातील काही देशांमध्ये कोरोनाच्या वेगवेगळ्या रुपाने थैमान घातले आहे. कोरोनाच्या उपचारासाठी ही एक टॅबलेट यशस्वीरित्या तयार करण्यात आली आहे. कोरोनाच्या लढाईत हे एक ऐतिहासिक पाऊल आहे.’

- Advertisement -

फायझरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष अल्बर्ट बोरुला म्हणाले की, ‘रुग्णालयात कोरोनाचा उपचार घेत असलेल्या २ हजार २०० लोकांवर या टॅबलेटची चाचणी केल्यानंतर त्यामध्ये अनपेक्षित परिणाम समोर आले आहेत. या टॅबलेटमुळे मृत्यूचा धोका ८८ टक्क्यांपर्यत कमी होऊ शकतो.’


हेही वाचा – Good News! ज्या देशातून ओमिक्रॉनला झाली सुरुवात, तिथूनच संसर्गाचा वेग घटला, प्रकरणांमध्ये 40% घट


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -