घरताज्या घडामोडीअमेरिकन संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांच्या घरावर हल्ला, पती जखमी

अमेरिकन संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांच्या घरावर हल्ला, पती जखमी

Subscribe

अमेरिका संसदेचे कनिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांच्या घरावर हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. नॅन्सी पेलोसी यांच्या कॅलिफोर्नियातील घरावर एका अज्ञात व्यक्तीने हल्ला केला.

अमेरिका संसदेचे कनिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांच्या घरावर हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. नॅन्सी पेलोसी यांच्या कॅलिफोर्नियातील घरावर एका अज्ञात व्यक्तीने हल्ला केला. हल्लेखोराने शुक्रवारी त्यांच्या घरात घुसून पतीला मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेत पती पॉल पेलोसी जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रुग्णालयात दाखल केल्यानंतर ते लवकर बरे होण्याची आशा डॉक्टरांनी व्यक्त केल्याचे समजते. या घटनेची माहिती मिळताच तातडीने तपासाला सुरूवात करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोराला या घटनेनंतर अटक करण्यात आली. या हल्लोखोराची अद्याप ओळख पटलेली नाही. तसेच, या हल्ल्यामागचे कारणही अद्याप समोर आलेले नाही.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. या घटनेवेळी नॅन्सी पेलोसी त्यांच्या कॅलिफोर्नियातील घरी नव्हत्या.

दरम्यान, नॅन्सी पेलोसी आणि पॉल पेलोसी यांचा विवाह 1963 मध्ये झाला होता. नॅन्सी अमेरिकन राजकारणातील एक शक्तिशाली नेता म्हणून ओळखली जाते, तर त्यांचे पती गुंतवणूकदार आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला त्याच्या कारला अपघात झाला होता, त्यानंतर पोलिसांनी दारूच्या नशेत गाडी चालवल्याबद्दल त्याच्यावर आरोप निश्चित केले होते. या प्रकरणात पॉल दोषी आढळला आणि त्याला पाच दिवस तुरुंगवास भोगावा लागला.

- Advertisement -

हेही वाचा – उद्धव ठाकरे पुन्हा सक्रिय; पुढील 15 दिवसात घेणार राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -