Homeदेश-विदेशUS Immigration Policy : ट्रम्प यांनी शपथविधी सोहळ्यास जिथे मोदींनाच निमंत्रित केले...

US Immigration Policy : ट्रम्प यांनी शपथविधी सोहळ्यास जिथे मोदींनाच निमंत्रित केले नाही…, ठाकरेंचा निशाणा

Subscribe

ट्रम्प यांच्या निर्णयांचे पडसाद म्हणा वा दुष्परिणाम जेव्हा जागतिक पातळीवर उमटायला लागले, तेव्हा हिंदुस्थानसह जगभरातील सारेच देश ट्रम्प यांच्या दुसऱ्या राजवटीकडे संशयाने बघू लागले आहेत.

मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दुसरा कार्यकाळ सुरू झाला आहे आणि पहिल्या कारकीर्दीपेक्षा त्यांची दुसरी कारकीर्द अंमळ अधिकच वादग्रस्त ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. ट्रम्प यांनी पहिलाच निर्णय घेतला तो अमेरिकेत अवैधरीत्या स्थलांतरित झालेल्या विदेशी नागरिकांविरुद्ध. ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जिगरी दोस्तान्यावर अगाढ श्रद्धा असणारा वर्ग, स्थलांतरितांना अमेरिकेबाहेर हाकलण्याच्या निर्णयातून मोदी नक्कीच काहीतरी मार्ग काढतील, असा विश्वास बाळगून होता. मात्र ट्रम्प यांनी आपल्या शपथविधी सोहळ्यास जिथे मोदी यांनाच निमंत्रित केले नाही, तिथे आपली काय डाळ शिजणार, या भयाने अमेरिकेत स्थलांतरित झालेले हजारो हिंदुस्थानी नागरिक आता हवालदिल झाले आहेत, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साधला आहे. (US Immigration Policy: Uddhav Thackeray’s criticism of Modi)

डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या या निर्णयाचा सर्वात मोठा फटका अमेरिकेत अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हिंदुस्थानी नागरिकांना बसला आहे. ट्रम्प आणि मोदी यांच्या गळापडू मैत्रीवर स्तुतीसुमने उधळणारा अमेरिकेतील मोठा हिंदुस्थानी वर्ग ट्रम्प यांचे हे नवे रूप पाहून मनातून हादरला असल्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना दैनिकातील अग्रलेखात नमूद केले आहे.

हेही वाचा – Munde on radar : बीडच्या त्या कामांची होणार पक्षांतर्गत चौकशी, खुद्द अजित पवारांनी दिले आदेश

कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता न करता जे लोक अमेरिकेत स्थलांतरित झाले आहेत, त्यांना शोधून त्यांची अमेरिकेतून हकालपट्टी करण्याची घोषणाच ट्रम्प यांनी केली आहे. केवळ घोषणा करूनच ते थांबले नाहीत, तर ट्रम्प यांच्या शपथविधीनंतर लगेचच संपूर्ण अमेरिकेत अवैध स्थलांतरितांना शोधण्यासाठी धाडसत्र सुरू झाले, याकडे त्यांनी या अग्रलेखाच्या माध्यमातून लक्ष वेधले आहे.

ट्रम्प यांच्या निर्णयांचे पडसाद म्हणा वा दुष्परिणाम जेव्हा जागतिक पातळीवर उमटायला लागले, तेव्हा हिंदुस्थानसह जगभरातील सारेच देश ट्रम्प यांच्या दुसऱ्या राजवटीकडे संशयाने बघू लागले आहेत. ट्रम्प राजवटीचे चटके असेच सुरू राहिले तर महासत्तेविरुद्ध आंतरराष्ट्रीय पातळीवर नवी मोर्चेबांधणी होऊ शकते, असा अंदाजही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. (US Immigration Policy: Uddhav Thackeray’s criticism of Modi)

हेही वाचा – Sanjay Raut : पंतप्रधान नरेंद्र मोदींवर संजय राऊतांचे टीकास्त्र; संसदेचा मॅरेज हॉल करुन टाकला