घर देश-विदेश अमेरिका : राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत भारतीय वंशाचा उद्योजक; वाढती लोकप्रियता ठरू शकते गेमचेंजर

अमेरिका : राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत भारतीय वंशाचा उद्योजक; वाढती लोकप्रियता ठरू शकते गेमचेंजर

Subscribe

पुढील वर्षी नोव्हेंबर महिन्यांत होऊ घातलेल्या अमेरिकेच्या राष्ट्रपती पदाची निवडणूक भारतीयांसाठी उत्सुकतेची ठरू शकते.

वाशिंगटन : पुढील वर्षी नोव्हेंबर महिन्यांत होऊ घातलेल्या अमेरिकेच्या राष्ट्रपती पदाची निवडणूक भारतीयांसाठी उत्सुकतेची ठरू शकते. कारण, अमेरिकेच्या राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत भारतीय वंशाच्या उद्योजकाचा समावेश असून, त्यांची लोकप्रियता दिवसागणिक वाढत असल्याची माहिती समोर आली आहे. (US Indian-origin entrepreneur in presidential race Growing popularity can be a game changer)

रिपब्लिकन पक्षातील उमेदवारांच्या शर्यतीत भारतीय-अमेरिकन उद्योजक विवेक रामास्वामी वेगाने पुढे जात असल्याचे दिसत असल्याने अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत भारतीयांची उत्सुकता आणखी वाढू शकते. एका नवीन सर्वेक्षणात ते फ्लोरिडाचे गव्हर्नर रॉन डीसँटिस यांच्यासोबत दुसऱ्या स्थानावर पोहोचले आहेत. इमर्सन कॉलेजच्या सर्वेक्षणानुसार, डीसँटीस आणि रामास्वामी 10-10 टक्क्यांच्या बरोबरीने आहेत. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 56 टक्के समर्थनासह आघाडीवर आहेत. भारतीय-अमेरिकन उद्योजक विवेक रामास्वामी यांची लोकप्रियता सातत्याने वाढत आहे. नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. खरे तर, सर्वेक्षणात, फ्लोरिडाचे गव्हर्नर रॉन डीसँटिस आणि रामास्वामी रिपब्लिकन अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी दुसऱ्या स्थानावर आहेत.

राधास्वामी यांनाच मत देण्याची मतदारांची तयारी

- Advertisement -

रामास्वामींना पाठिंबा देणार्‍यांनी त्यांनाच मत द्यायचे आहे, हेही या सर्वेक्षणातून समोर आले आहे. उल्लेखनीय म्हणजे, रामास्वामी समर्थकांपैकी जवळपास निम्म्या समर्थकांनी ते निश्चितपणे त्यांना मत देतील असे सांगितले, तर डीसँटीस समर्थकांपैकी फक्त एक तृतीयांश लोकांनी हे आश्वासन दिले.

हेही वाचा : लॅंडीग आधीच रशियायाचे लूना-25 चंद्रावर कोसळले; आता भारताच्या चांद्रयान-3 कडे जगाचे लक्ष

चार दिवसांपूर्वी झाला सर्वे

- Advertisement -

1000 नोंदणीकृत मतदारांमध्ये 16 आणि 17 ऑगस्ट दरम्यान सर्वेक्षण करण्यात आले होते. ज्यामध्ये 465 मतदारांचाही समावेश होता. ते म्हणाले की, त्यांच्या राज्याच्या रिपब्लिकन प्राथमिक किंवा कॉकसमध्ये मतदान करण्याची त्यांची योजना आहे.

हेही वाचा : Imaan Hazir Mazari: ‘खरे दहशतवादी लष्करात बसलेत…’ असं म्हणताच, पाकिस्तानी तरुणी झाली किडनॅप

नोव्हेंबरमध्ये होणार राष्ट्रपती पदासाठी निवडणूक

अमेरिकेमध्ये 5 नोव्हेंबर 2024 मध्ये 60 राष्ट्रपती पदासाठी निवडणूक पार पडणार आहे. यासाठी डेमोक्रेटिक आणि रिपब्लिकन हे दोन पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. डेमोक्रेटिक पक्षाकडून सध्याचे राष्ट्रपती जो बाइडन हे पुन्हा एकदा राष्ट्रपती बनण्यासाठी इच्छूक आहेत तर कमला हैरिससुद्धा दुसऱ्यांदा उपराष्ट्रपती बनण्यासाठी इच्छूक असल्याची माहिती आहे. तर रिपब्लिकन पार्टीकडून माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंपसुद्धा राष्ट्रपती पदासाठी इच्छूक असून, ते निवडणुकीसाठी मैदानात उतरतील.

- Advertisment -