Eco friendly bappa Competition
घर क्राइम US : गाडीला धडकून भारतीय वंशाच्या महिलेचा मृत्यू झाल्यावर पोलिसांकडून चेष्टा; चौकशी सुरू

US : गाडीला धडकून भारतीय वंशाच्या महिलेचा मृत्यू झाल्यावर पोलिसांकडून चेष्टा; चौकशी सुरू

Subscribe

US : भारतीय वंशाच्या महिलेच्या मृत्यूची चेष्टा केल्याप्रकरणी अमेरिकेतील सिएटल पोलिसांनी युनियन नेत्याविरुद्ध तपास सुरू केला आहे. खरं तर, यावर्षी जानेवारीमध्ये पोलिसांच्या गाडीच्या धडकेने एका महिलेचा मृत्यू झाला होता. यानंतर सिएटल पोलीस युनियनचा नेता महिलेच्या मृत्यूवर हसताना आणि चेष्टा करतानाचा व्हिडीओ बॉडी कॅमेरात रेकॉर्ड झाला होता. (US Joke by police after Indian origin woman dies after being hit by car Inquiries begin)

हेही वाचा – राम मंदिर बांधकामाच्या खोदकामात सापडले प्राचीन शिलालेख; मूर्ती, स्तंभाचाही समावेश

- Advertisement -

सोमवारी (11 सप्टेंबर) सिएटल पोलीस विभागाने अधिकारी जेनिएल ऑडियरच्या बॉडी कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालेला व्हिडिओ फुटेज जारी केला आहे. अमेरिकेतील माध्यमांच्या माहितीनुसार, ही घटना घडली तेव्हा जेनिएल ऑडियरचा बॉडी कॅमेरा चालू होता. पोलीस गाडी चालवत असलेल्या केविन डेव्हने भारतीय वंशाच्या जान्हवी कमदुला या महिलेला धडक दिली. यानंतर महिलेचा मृत्यू झाला. या घटनेच्या एका दिवसानंतर पोलिसांनी सांगितले होते की, केविन डेव्ह पोलीस गाडी चालवत असताना फोन कॉलमध्ये व्यस्त होता. समोर आलेल्या व्हिडिओ फुटेजमध्ये तो गाडी चालवत असताना फोनवर कोणाशी तरी बोलत असल्याचे ऐकू येत आहे.

व्हिडिओमध्ये जेनिएल ऑडियर म्हणताना ऐकू येत आहे की, ती महिला मेली आहे. व्हिडीओमध्ये केविन डेव्ह हा पोलीस अधिकारी या महिलेकडे पाहताना म्हणतो की, ही सामान्य व्यक्ती आहे. व्हिडीओच्या शेवटी केविन डेव्ह हसताना म्हणातो की, $11,000 चा चेक तयार कर, कारण ही महिला 26 वर्षांची आहे आणि तिचे मूल्य एवढेच आहे. दरम्यान, जान्हवी कमदुला ही मूळची आंध्र प्रदेशची असून, तिचे पदवीचे शिक्षण यावर्षी डिसेंबरमध्ये पूर्ण होणार होते. मात्र त्याआधीच तिला आपले प्राण गमवावे लागले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – लिबियामध्ये महापुरामुळे हाहाकार; पाच हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

डेव्हेने कबूल केले वेगाने गाडी असल्याचे 

दरम्यान, या घटनेवर बोलताना जेनिएल ऑडियर म्हणाला की, गुन्हेगारी तपास होईल यावर माझा विश्वास बसत नाही. कारण डेव्ह ताशी 50 किमी वेगाने गाडी चालवत होता. गाडी नियंत्रणाबाहेर नव्हती आणि प्रशिक्षित ड्रायव्हर बेपर्वाई करू शकत नाही. एका अहवालात असे म्हटले आहे की, डेव्ह 25 किमी/तास झोनमध्ये 70 किमी/तास वेगाने गाडी चालवत होता. याशिवाय डेव्हनेही कबूल केले की, तो वेगाने गाडी चालवत होता आणि महिलेला धडक देण्यापूर्वी तो गाडीचा वेग कमी करण्यात अयशस्वी ठरला. रिपोर्टनुसार त्याने महिलेवर सीपीआरही दिल्याचे सांगितले आहे.

- Advertisment -