Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश पुढील दोन वर्षांत भारतात अमेरिकेसारखे रस्ते बनवू, नितीन गडकरींचे आश्वासन

पुढील दोन वर्षांत भारतात अमेरिकेसारखे रस्ते बनवू, नितीन गडकरींचे आश्वासन

Subscribe

भारतातील रस्त्यांसंदर्भात केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी राज्यसभेत मोठे आश्वासन दिले आहे. अवघ्या दोन वर्षात देशातील रस्ते अमेरिकेसारखे होतील, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाने पैशाची कोणतीही कमतरता नाही असं नितीन गडकरी म्हणाले. राज्यसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात एका प्रश्नाला उत्तर देताना गडकरींनी हे आश्वासन दिले आहे.

केंद्रीय मंत्री गडकरी यांनी 2024 पर्यंत भारतातील पायाभूत सुविधा युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकासारखे चांगल्या असतील असे वचन दिले, त्यांनी असाही दावा केला की, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) कडे पैशांची कमतरता नाही, ते आर्थिकदृष्ट्या खूप मजबूत आहे. संसदेत बोलताना गडकरी म्हणाले की, मी वचन देतो की, 2024 पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली भारताचे रस्ते आणि पायाभूत सुविधा अमेरिकेत आहेत तसा असतील.

26 हरित द्रुतगती मार्ग बांधण्याचे नियोजन

- Advertisement -

नितीन गडकरी म्हणाले की, सरकार येत्या 3 वर्षात देशात 26 हरित द्रुतगती मार्ग तयार करण्याचा विचार करत आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या तयारीनंतर दिल्ली ते डेहराडून, हरिद्वार किंवा जयपूरचा प्रवास अवघ्या दोन तासांत करता येईल.

मेरठ ते दिल्ली प्रवास केवळ 40 मिनिटांत 

केंद्रीय मंत्री म्हणाले की, एकदा हे एक्सप्रेस वे तयार झाल्यानंतर दिल्ली ते चंदीगड अवघ्या 2.5 तासांत, दिल्ली ते अमृतसर 4 तासांत, दिल्ली ते कटरा 6 तासांत, दिल्ली ते श्रीनगर 8 तासांत पोहचू शकतो. तर दिल्ली ते मुंबई १२ तासात आणि चेन्नई ते बंगळूरु हे अंतर 2 तासात कापता येणार आहे. रस्त्याच्या विस्ताराचे वर्णन करताना त्यांनी उदाहरण दिले की, पूर्वी मेरठहून दिल्लीला जाण्यासाठी 4.5 तास लागत होते. पण आता हा प्रवास 40 मिनिटांत पूर्ण करता येतो.

- Advertisement -

राज्यसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्नांना उत्तर देताना गडकरी म्हणाले की, देशात सातत्याने रस्त्यांचे विस्तारीकरण केले जात आहे. यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे (NHAI) पैशांची कमतरता नाही, प्राधिकरण आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. NHAI दरवर्षी सुमारे 5 लाख किमीचे रस्ते तयार करू शकते यावरून याचा अंदाज लावता येतो.


हेही वाचा : जम्मू काश्मीरवर दहशतवादी हल्ल्याचे सावट, सर्व जिल्हा पोलिसांना सतर्कतेच्या सूचना

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -