घरताज्या घडामोडीPutin US Doomsday Plane: पुतिनकडून आण्विक हल्ल्याची धमकी, अमेरिकेचे हवाई दल सज्ज

Putin US Doomsday Plane: पुतिनकडून आण्विक हल्ल्याची धमकी, अमेरिकेचे हवाई दल सज्ज

Subscribe

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेन हल्ल्याच्या दरम्यान आण्विर हल्ल्याची धमकी दिली आहे. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर नाटो देशांना अणुबॉम्ब टाकण्याची धमकी दिल्यानंतर आता अमेरिकेचे हवाई दल सज्ज झाले आहेत. अणुबॉम्ब हल्ल्यास उत्तर देण्यास सक्षम असलेले प्लेन ऑफ द ग्रेट डिस्ट्रक्शन २८ फेब्रुवारी रोजी अमेरिकेतील नेब्रास्का येथे काही काळ हवेत प्रशिक्षण उड्डाणासाठी निघाले. याआधी पुतिन यांनी आपल्या अण्वस्त्र सैन्याला हाय अलर्टवर ठेवले आहे.

अमेरिकेने बोईंग ७४७ विमानाचे नाव बदलून बोईंग E-4B’नाइटवॉच’ असे ठेवले आहे. नेब्रास्का येथील यूएस एअर फोर्स बेसवरून विमानाने उड्डाण केले आणि सुमारे ४.५ तास शिकागोच्या आकाशात उडत राहीले, असं एका वृत्तापत्राने म्हटलंय. त्यानंतर ते विमान परतले. प्रशिक्षण आणि तयारी मोहिम पार पाडण्यासाठी US किमान एक E-4B नेहमी अलर्टवर ठेवते.

- Advertisement -

सोमवारी झालेल्या डिस्ट्रक्शनच्या विमानाचा पुतीन यांच्या आदेशाशी थेट संबंध आहे की नाही, हे अद्यापही अस्पष्ट आहे. यापूर्वी पुतिन यांनी रशियाची आण्विक क्षेपणास्त्रे तैनात करण्याचे आदेश दिले होते. पुतीन यांनी नाटो देशांसोबत केलेली आक्रमक विधाने आणि रशियाविरुद्ध पाश्चात्य आर्थिक निर्बंधांचा हवाला दिला. अमेरिकन सरकारने सोमवारी सांगितले की, त्यांचा देश आपली भूमिका बदलणार नाही. रशियाच्या अण्वस्त्रांपासून अमेरिकेला घाबरण्याची गरज नाही, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन म्हणाले.

अमेरिकेच्या नाईटवॉच विमानांमध्ये जगात मोठा विनाश घडवून आणण्याची क्षमता आहे. अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेले हे विमान अमेरिकेचे ४,३१५ अणुबॉम्ब नियंत्रित करण्यास सक्षम आहे. जेव्हा अमेरिकेवर संकट येते तेव्हा अमेरिकन हवाई दलाचे हे विमान हवेत उडते. यापूर्वी, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी येताच या विमानाने हवेत उड्डाण घेतले होते. तसेच हे विमान ९/११ च्या हल्ल्यानंतरही वापरण्यात आले होते. यूएस एअर फोर्सच्या ई-4बी विमानात बोईंग 747-200 बी विमानात बदल करण्यात आले. अमेरिकन हवाई दल अशा ४ विमानांचा वापर करतात.

- Advertisement -

हेही वाचा : स्थायी समितीतील ६५० कोटींचा फेरफार आयुक्तांकडून रद्द; भाजपाचा दावा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -