घरदेश-विदेशलादेनच्या मुलावर अमेरिकेने जाहीर केले १ दशलक्ष डॉलरचे इनाम

लादेनच्या मुलावर अमेरिकेने जाहीर केले १ दशलक्ष डॉलरचे इनाम

Subscribe

अल कायदा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याचा मुलगा हमजा ओसामा लादेन याच्यावर अमेरिकेने १० दशलक्ष डॉलरचे इनाम जाहीर केलं आहे. त्याने दहशतवादी कारवाई करण्याच्या आत अमेरिकाला तो हवा आहे.

ओसामा बिन लादेनच्या मुलावर अमेरिकेने १ दशलक्ष डॉलरचे इनाम जाहीर केलं आहे. ओसाम बिन लादेनचा मुलगा हामजा याने ओसामाची जागा घेतली आहे. तो आपल्या वडिलाच्या हत्येचा बदला घेण्याचा कट रचत आहे. त्यामुळे त्याने काही दहशतवादी कारवाई करण्याअगोदरच अमेरिकेला त्याला पकडायचे आहे. यासाठी अमेरिकेने १ दशलक्ष डॉलरचं इनाम जाहीर केलं आहे.

- Advertisement -

काय आहे नेमकं प्रकरण?

अल कायदा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या ओसामा बिन लादेनने अमेरिकेच्या ट्विन टॉवरवर विमान हल्ला केला होता. या घटनेत अडीच हजार पेक्षा जास्त नागरिक मारले गेले होते. त्यानंतर अमेरिकेने लादेनचा तपास लावला. लादेनला शोधण्यासाठी अमेरिकेने इनाम जाहीर केले होते. अखेर, लादेनचा तपास लागला. अमेरिकेने पाकिस्तानात शिरुन त्याला ठार केले होते. पाकिस्तानच्या अबोटाबाद येथे अमेरिकेने ते यशस्वी ऑपरेशन पार पाडले होते. लादेनला ठार केल्यापासून अल कायदा ही संघटना शांत बसली आहे. परंतु, ही वादळा पूर्वीची शांतता आहे, असं अमेरिकेला वाटत आहे. लादेनचा मुलगा हामजा बिन लादेन सध्या हा अल कायदासह इतर जिहादी संघटनांचा म्होरक्या झाला आहे. त्याला जिहादींचा राजा देखील संबोधलं जात आहे. त्याने दहशतवाद्यांचे जाळे उभारण्यास सुरुवातही केली आहे. त्यामुळे त्याला वेळीच ठेचनं महत्वाचं असल्याच अमेरिकेनं म्हटलं आहे.

काय म्हणालं अमेरिका?

या संदर्भात अमेरिकेचे अधिकारी नॉथन सेल्स म्हणाले की, ‘गेल्या काही दिवसांपासून अल कायदा शांत आहे, मात्र ते त्यांच आत्मसमर्पण नाही. याबाबत आम्हाला कोणतीही चूक करायची नाही. अल कायदा या दहशतवादी संघटनेकडे हल्ला करण्याची क्षमता आणि कारणही आहे. त्यामुळे हामजाने हल्ला करण्याअगोदर तो आम्हाला हवा आहे.’

- Advertisement -


वाचा –ओसामा बिन लादेन लाजाळू होता – लादेनच्या आईचा दावा

वाचा – जे अमेरिकेला शक्य आहे, ते भारतही करू शकतो – अरूण जेटली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -