घरदेश-विदेशट्रम्प की बायडेन? अमेरिकेत उद्या होणार मतदान; कशी असेल मतदान प्रक्रिया जाणून...

ट्रम्प की बायडेन? अमेरिकेत उद्या होणार मतदान; कशी असेल मतदान प्रक्रिया जाणून घ्या

Subscribe

कोरोनाच्या संकटात जगातील जगातील सर्वात जुन्या लोकशाहीची निवडणूक होणार आहे. ३ नोव्हेंबरला अमेरिकेत मतदान होणार असून अमेरिकन जनता नवा अध्यक्ष निवडणार आहेत. अमेरिकेची निवडणूक ही सर्व देशांसाठी महत्त्वाची असून सर्वांचे लक्ष या निवडणुकीवर आहे. डेमोक्रॅटीक पक्षाचे जो बायडेन आणि रिपब्लिकन पक्षाचे आणि अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात लढाई आहे. दरम्यान, ३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीआधी आलेल्या एका सर्वेक्षणात राष्ट्रपती ट्रंप यांच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. अमेरिकेच्या या नव्या सर्वेक्षणानुसार राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या दृष्टीने सर्वात महत्वाच्या असणाऱ्या चार राज्यांमध्ये जो बायडेन हे ट्रंप यांच्या पुढे जाताना दिसत आहे. मात्र, ३ नोव्हेंबरला नक्की काय होणार याकडेच आता सर्वांचे लक्ष लागून आहे.

अमेरिकेच्या निवडणुकीसाठी नोव्हेंबरचा पहिला मंगळवार ठरलेला आहे. त्याअंतर्गत अमेरिकन जनता यावेळी ३ नोव्हेंबरला मतदान करणार आहे. अमेरिकन वेळेनुसार मतदानाची प्रक्रिया सकाळी ६ वाजल्यापासून सुरू होईल आणि रात्री नऊ वाजेपर्यंत चालेल. ज्यांना आपल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावयाचे आहे, त्यांना येथे पोहचून मतदान करता येईल. .

- Advertisement -

यावेळी वेगळं असं काय आहे?

यावेळेस ३ नोव्हेंबर वेगळा असणार आहे कारण निवडणुकीच्या दिवसापूर्वी रेकॉर्ड मते आधीच टाकली गेली आहेत. Early Ballots Votes अंतर्गत अमेरिकेत निवडणुकीच्या दिवसाआधी ९ कोटीहून अधिक लोकांनी मतदान केले, जे अमेरिकन निवडणुकीच्या इतिहासातील हा एक रेकॉर्ड आहे. यावेळी अमेरिकेच्या २०१६ च्या निवडणुकीत एकूण मतदानाच्या तुलनेत ही संख्या सुमारे ६५ टक्के अधिक आहे. दरम्यान, आता उद्या होणाऱ्या मतदानासह बॅलेट पेपरवर झालेल्या मतदानावर देखील लक्ष आहे.

३ नोव्हेंबरला अमेरिकन मतदार कोणाला मतदान करणार?

अमेरिकेत केवळ दोन अध्यक्षीय उमेदवार आहेत, एक डोनाल्ड ट्रम्प आणि एक जो बायडेन. परंतु ३ नोव्हेंबर रोजी मतदार त्यांना थेट मतदान करणार नाहीत, तर त्यांच्या क्षेत्रातील उमेदवारांना मतदान करतील. त्यानंतर राष्ट्राध्यक्षाची निवड होणार आहे. अमेरिकेत एकूण ५० राज्ये असून लोकसंख्येनुसार प्रत्येक राज्यात वेगवेगळे मतदार आहेत.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -