Saturday, June 19, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर देश-विदेश Covid-19 vaccine: अमेरिकेचे अध्यक्ष जो बाइडन ५० कोटी Pfizer लसींचं करणार वाटप!

Covid-19 vaccine: अमेरिकेचे अध्यक्ष जो बाइडन ५० कोटी Pfizer लसींचं करणार वाटप!

Related Story

- Advertisement -

जगभरात कोरोना कहर गेल्या एक ते दीड वर्षापासून कायम आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दिवसेंदिवस बाधित होणाऱ्यांचे प्रमाण देखील वाढत आहे. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष जो बाइडन यांनी जगभरात कोरोना विषाणूचा घातक परिणाम बघता महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अमेरिकन प्रशासन फायझर बायो एन टेक कोविड लसीचे ५० कोटी डोस इतर देशांमध्ये वितरणासाठी खरेदी करीत आहे. यासंदर्भातील खुलासा अमेरिकन माध्यमांनी बुधवारी केला. या आठवड्यात ब्रिटनमध्ये होणाऱ्या G-7 बैठकीत अमेरिकेचे अध्यक्ष जो बाइडन याची औपचारिक घोषणा करतील असेही सांगण्यात आले आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गादरम्यान, जगातील बर्‍याच देशांमध्ये लसीची तुटवडा भासत आहे, अशा परिस्थितीत जो बाइडन यांनी हे पाऊल उचलले आहे. जेणेकरून गरीब देशांना याची मदत होईल, असेही सांगितले जात आहे. यासह कोरोना विषाणूविरूद्ध, अमेरिकेने त्याच्या संपूर्ण लोकसंख्येच्या निम्म्याहून अधिकांना कोरोना लसचे दोन्ही डोस दिले आहेत, त्यानंतर कोरोनाच्या प्रादुर्भावादरम्यान कोरोनाच्या घटनांमध्ये लक्षणीय घट झाल्याचे समोर आले आहे.

G7 बैठकीपूर्वीच बाइडन यांनी दिले संकेत

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, अध्यक्ष जो बाइडन यांनी ब्रिटनमधील ७ देशांसोबत G7 बैठकीच्या पूर्वी ही लस देण्याचे संकेत दिले आहेत. प्रत्यक्षात जेव्हा स्थानिक माध्यमांनी बाइडन यांना विचारले, जगातील लोकांना कोरोना लस देण्याचे धोरण आहे का? यावर त्यांनी उत्तर दिले की, ‘माझ्याकडे एक धोरण आहे आणि मी ते लवकरत जाहीर करीन’.

बाइडन फायझरच्या CEO यांच्यासह करणार घोषणा

बाइडन यांनी ही घोषणा फायझरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अल्बर्ट बौर्ला यांच्यासह करणार आहे. ही घोषणा अमेरिकेच्या हितासाठी नसून जगाच्या हितासाठी करण्यात येणार असल्याचेही त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.


डोनाल्ड ट्रम्प यांचा TikTok, WeChatसारख्या चीन Appsवरील बंदीचा निर्णय जो बायडेन यांनी खोडला!
- Advertisement -